शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांची साथ, तरच होईल कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:28 IST

जिल्हाधिकारी : ‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ अंतर्गत संवाद चंद्रपूर : मागील दोन आठवड्यापूर्वी एक अंकी येणारी नवीन कोरोना बाधितांची ...

जिल्हाधिकारी : ‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ अंतर्गत संवाद

चंद्रपूर : मागील दोन आठवड्यापूर्वी एक अंकी येणारी नवीन कोरोना बाधितांची संख्या आता १२० च्या वर गेली आहे. नागपूर, अमरावती व इतर जवळच्या जिल्ह्यात नवीन बांधितांची संख्या हजारच्या संख्येने आढळून येत आहे. ही धोक्याची घंटा ऐकून नागरिकांनी कोरोनाला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. नागरिकांना मास्कचा वापर, सुरक्षित अंतराचे पालन व वारंवार हात धुणे या कोरोना त्रिसूत्री नियमांचे पालन करण्यास उद्युक्त करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सर्वांची साथ मिळाली तर कोरोनावर सहज मात करता येईल असे मत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्यक्त केले.

‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी भद्रावती येथील स्थानिक मंगल कार्यालयात व वरोरा येथील नगरपरिषदेच्या सभागृत विभागातील लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांची संवाद साधला. यावेळी भद्रावती येथील नगराध्यक्ष अनिल धानोरकर, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सुर व अर्चना जीवतोडे, तसेच वरोरा येथे नगराध्यक्ष अहतेशामअली, बांधकाम सभापती राजू गायकवाड, पंचायत समिती सभापती धोपटे, उपसभापती संजीवनी भोयर, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे, पोलीस निरीक्षक सुनील पवार, यांच्यासह तहसीलदार प्रशांत बेडसे, तहसिलदार मंगेश शिंदोळे, गट विकास अधिकारी मंगेश आरेवार, तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व सरपंच, नगरसेवक तसेच तालुका आरोग्य अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी मध्यंतरी कोरोना बांधिताची संख्या कमी झाल्याने नागरिकांमध्ये गाफीलपणा वाढल्याचे सांगितले.