शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कामगारांच्या पगाराचे अनुदान मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 22:53 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या थकित वेतनासाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात २३ आॅगस्टपासून काम बंद आंदोलन सुरू होते. जोपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या खात्यावर शासनाकडून वेतन अनुदान जमा होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतेली होती.

ठळक मुद्देकाम बंद आंदोलन मागे : ८० लाख रुपये अनुदान जमा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या थकित वेतनासाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात २३ आॅगस्टपासून काम बंद आंदोलन सुरू होते. जोपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या खात्यावर शासनाकडून वेतन अनुदान जमा होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतेली होती. याची दखल घेत शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बीडीएस प्रणालीवर वेतन अनुदानापोटी ८० लाख रुपये जमा करण्यात आले.वेतन अनुदान जमा झाल्यानंतर जिल्हाधिकारी खेमनार यांनी याबाबत सोमवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी कलंत्रे यांच्या कक्षात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये उपनिवासी जिल्हाधिकारी वैभव नावडीकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डी. एस. मोरे, कामगार अधिकारी यु. एस. लोया, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी राठोड, प्रहार संघटनेचे पप्पू देशमुख, सतीश खोब्रागडे, घनशाम येरगुडे, दिनेश कंपू, धर्मेंद्र शेंडे, कांचन चिंचेकर, सतीश येसांबरे, तारा ठमके, ज्योती कांबळे, शेवंता भालेराव, रजिया पठाण, मनीषा डफ, सतीश घोडमारे, अमोल घोडमारे, राकेश मस्कावार, विशाल डोर्लीकर, करण कडस्कर, अमिता वानखेडे, रवी काळे, निशा साव, भाग्यश्री मुधोळकर, गिरीधर खंडाळकर तसेच कंत्राटदार बंडीवार व संतोष कुचलकर उपस्थित होते.बैठकीमध्ये कामगारांचे थकित वेतन तीन ते चार दिवसांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावे, असे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी कलंत्री यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मोरे यांना दिले. तसेच कामगारांच्या इतर मागण्यांवरसुद्धा तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. पुढील सात दिवसांमध्ये पुन्हा सर्व संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्याचे आश्वासन अतिरिक्त जिल्हाधिकारी कलंत्रे यांनी कामगारांच्या शिष्टमंडळाला दिले. यानंतर प्रहारचे देशमुख मंगळवारी कामगारांशी चर्चा करून काम बंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्व कामगार पूर्वरत कामावर रुजू झाले.