शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
2
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
3
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
4
"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन
5
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
6
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
7
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
9
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
10
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
11
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
12
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
13
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
14
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
15
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
16
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
17
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
18
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
19
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!

अखेर संघटनेपुढे झुकले एसडीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 5:00 AM

वरोरा येथे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोरोनासंदर्भात आढावा सभा घेतली. यावेळी तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते. सभा आटोपल्यानंतर जिल्हाधिकारी चंद्रपूरकडे रवाना झाले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी अन्य अधिकाऱ्यांना चहापानासाठी आपल्या दालनात बोलाविले.

ठळक मुद्देमागितली माफी : प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिली अधिकाऱ्यांसमोर अपमानास्पद वागणूक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढावा सभेनंतर स्वत:च्या दालनात बोलावून अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांसमोर प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणारे वरोरा येथील उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्याविरुद्ध जिल्ह्यातील विस्तार अधिकारी संघटना तसेच वरोरा तालुका प्राथमिक शिक्षक संघटना संतापल्या. दरम्यान, संघटनांचा रोष बघता उपविभागीय अधिकाऱ्यांनी माफी मागितली. मात्र संघटनांचे समाधान झाले नसल्याने त्यांनी शासन तसेच प्रशासनाला निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.वरोरा येथे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोरोनासंदर्भात आढावा सभा घेतली. यावेळी तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते. सभा आटोपल्यानंतर जिल्हाधिकारी चंद्रपूरकडे रवाना झाले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी अन्य अधिकाऱ्यांना चहापानासाठी आपल्या दालनात बोलाविले. यावेळी बीडीओसह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना बैठकीमध्ये योग्य उत्तर दिले नसल्याचे कारण समोर करीत त्यांच्यावर संताप व्यक्त केला. एवढेच नाही तर त्यांना तब्बल अर्धा तास उभे ठेवून १४ आणि १९ चा पाढा म्हणायला लावला. फुटकचे वेतन घेत असल्याचेही त्यांना सुनावल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, अपमानास्पद वागणुकीमुळे प्रभारी गटशिक्षणाधिकारी अक्षरश: रडल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यानंतर अपमान सहन झाला नसल्याने त्यांनी संघटनांकडे आपण आत्मदहन करणार असल्याचे निवेदन दिले. त्यानंतर संघटनांनी सोमवारी सकाळी एसडीओ शिंदे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना जाब विचारला. यावेळी आपला अपमान करण्याचा कोणताही उद्देश नसल्याचे सांगून त्यांनी माफी मागितली. मात्र संघटनांचे समाधान झाले नाही. दरम्यान, संघटनांनी महसूल मंत्री, पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले.आढावा सभा संपल्यानंतर जिल्हाधिकारी गेले. त्यानंतर एसडीओंनी प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना अवास्तव प्रश्न विचारून त्यांना अपमानित केले. हा अपमान सहन झाला नसल्याने त्यांनी संघटनेकडे आत्मदहन करण्याचा इशारा दिला.याची दखल घेत एसडीओंना जाब विचारण्यात आला. दरम्यान, उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी माफी मागितली.- रवींद्र लामगे, अध्यक्ष, शिक्षण विस्तार अधिकारी, संघटना चंद्रपूरप्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना कोणतीही अपमानास्पद वागणूक दिली नाही. त्यांना उभे ठेवण्याची शिक्षाही दिली नाही. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ यासंदर्भात दोन मिनीटात आढावा सादर करण्यास सांगितले.- सुभाश शिंदे, उपविभागीय अधिकारी, वरोरा