शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर सायन्स पार्क, आझाद बगिचा मार्गी

By admin | Updated: July 16, 2016 01:04 IST

गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी सदस्यांच्या आक्षेपामुळे रखडलेल्या रामाळा तलाव बगिचातील सायन्स पार्कची ....

स्थायी समिती : सत्ताधारी सदस्यांचा बगिचा विकासावर आक्षेप चंद्रपूर : गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी सदस्यांच्या आक्षेपामुळे रखडलेल्या रामाळा तलाव बगिचातील सायन्स पार्कची निविदा स्थायी समितीने शुक्रवारी मंजूर केली. तसेच आझाद बगिचाचे विद्युतीकरण व विकास करण्याचाही निर्णय घेण्यात आला. मात्र, सत्ताधारी सदस्यांनी शहरात अनेक समस्या कायम असताना आझाद बगिचाचा विकास कशाला करता, असा आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी रमाई घरकूल योजनेचा निधी खर्च होत नसल्याबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यापूर्वीच रामाळा तलाव येथील बगिचामध्ये सायन्स पार्क उभारण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशाकीय मंजुरी दिली आहे. सायन्स पार्कच्या उभारणीकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये सर्वात कमी ४.८१ टक्के एवढ्या कमी दराची निविदा मे. एस. व्ही. एम. कंस्ट्रक्शनने भरली होती. मनपाच्या स्थायीे समितीच्या सभेत हा विषय शुक्रवारी चर्चेला आला. रामाळा तलावाची देखभाल जिल्हाधिकाऱ्यामार्फत सिंचन विभाग करतो. आता या तलावात सायन्स पार्क उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी ९३.६८ लाख रुपये किंमतीच्या कामाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. सायन्स पार्क उभारणीकरिता ९३ लाख ६८ हजार ३५३ रुपये खर्च अपेक्षित आहे. चंद्रपूर येथील मे. एसव्हीएम कंस्ट्रक्शनने ८९ लाख ०८ हजार ७५ रुपयांचा आराखडा मांडला आहे. ही निविदा सर्वात कमी किंमतीची असल्याने एस. व्ही. एम. कन्स्ट्रक्शनला सायन्स पार्क उभारणीचे काम देण्यावर स्थायी समितीच्या सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. स्थायी समितीच्या सभेत दुसरा महत्त्वाचा विषय शहरातील आझाद बगिचाच्या विद्युतीकरण व विकासाचा होता. त्याकरिता ५ कोटी ४२ लाख २५ हजार ९०१ रुपये खर्च अपेक्षित आहे. आझाद बगिचासाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेत नागपूर येथील मे. खळतकर कंस्ट्रक्शनने ८.६१ टक्के कमी दराने, चंद्रपूरच्या मे. विजय आर. घाटे इंजिनिअर कन्स्ट्रक्शनने ९.१० टक्के कमी दराने तर त्या दोघांपेक्षा अधिक किंमतीची नागपूर येथील मे. प्रशांत कंस्ट्रक्शनने निविदा दाखल केली होती. त्यातील सर्वात कमी दराची असलेली निविदा स्थायी समितीने मंजूर केली. एकीकडे मनपा आझाद बगिचाचा विकास करू इच्छिते. त्याकरिता निविदा प्रक्रिया राबवून कामदेखील सोपविण्यात आले आहे. त्याच वेळी भाजपचे सदस्य धनंजय हूड व राहुल पावडे यांनी बगिचाच्या विकास कामावर नाराजी व्यक्त केली. शहरात अनेक समस्या कायम आहेत. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे चैनीचा बगिचा हवाच कशाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सभेला स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे, मनपा आयुक्त संजय काकडे, उपायुक्त विजय इंगोले, लेखाधिकारी गायकवाड आदींसह समितीचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)