शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या आदेशानंतरही जमीन मोजणीचे काम थंडबस्त्यात

By admin | Updated: January 11, 2015 22:48 IST

आंध्र-महाराष्ट्र सिमेवरील १४ गावांचे भूमापन व मोजणी करण्याच्या सूचना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ३१ जानेवारी २०१४ ला जिवती तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान केली होती.

जिवती : आंध्र-महाराष्ट्र सिमेवरील १४ गावांचे भूमापन व मोजणी करण्याच्या सूचना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ३१ जानेवारी २०१४ ला जिवती तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान केली होती. मात्र, प्रस्तावास मंजूरी न मिळाल्याने एक वर्षापासून जमीन मोजणीचे काम थंडबस्त्यात आहे.१४ गावातील जमिनीची विशेष बाब म्हणून मोजणी करण्यासाठी अंदाजीत ८० लाख रुपयाचा खर्च अपेक्षीत असल्याने शासनाच्या मंजुरीचा प्रस्ताव उपसंचालक भूमिअभिलेख सलग्न जमाबंदी आयुक्त (भूमापण पुणे) यांच्याकडून अप्पर मुख्य सचिव (महसूल) यांचेकडे ३ फेब्रुवारी रोजी पाठविण्यात आला. परंतु, सदर प्रस्तावास अद्यापही मंजुरी नसल्यामुळे सिमेवरील शेतकऱ्यांचे प्रश्न अजून किती दिवस रेंगाळत राहणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.महाराष्ट्र शासनाने १४ फेब्रुवारी १९९६ ला मुकादमगुडा, परमडोली, तांडा, कोठा (बु.), लेंडीजाळा, महाराजगुडा, शंकरलोधी, पद्मावती, अंतापूर, इंदिरानगर, येसापूर, पळसगुडा, भोलापठार लेंडीगुडा या गावातील शेतकऱ्यांना माजी पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री शोभाताई फडणवीस यांच्या हस्ते सातबारा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. मात्र या सातबारामध्ये भोगवटदार रकान्यात सरकार अशी नोंद आहे. नमुना बारामध्ये जमीन कसणाऱ्याचे नाव आहे. त्यामुळे ती सरकारची जमीन समजली जाते. त्यामुळे सातबरा असूनही शेतीसंबंधी राबविल्या जाणाऱ्या शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. एवढेच नाही तर शासनाकडून मिळणारी दुष्काळग्रस्त निधीही मिळत नाही.१९५६ मधील राज्य पूर्नरचनेनंतर पूर्वीच्या हैद्राबाद राज्यामधील आदिलाबाद जिल्ह्यातील राजुरा तालुका तत्कालीन मुंबई राज्यामधील नांदेड जिल्ह्यात हस्तांतरीत करण्यात आला आहे. त्यानंतर तो महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला. राजुरा तालुका व आसिफाबाद तालुक्याच्या जंगलातील सिमेलगत परमडोली, मुकादमगुडा, कोंढा बु., तांडा, लेंडीजाळा, शंकरलोधी, अंतापूर, येसापूर, भोलापठार, पळसगुडा, महाराजगुडा, पद्मावती, इंदिरानगर, लेंडीगुडा ही १४ गावे असून जिवती तालुक्याच्या निर्मितीनंतर ती अंतर्भूत करण्यात आली आहेत. या १४ गावामध्ये भूमिअभिलेख कार्यालयाकडून कोणतीही मोजणी झालेली नसून पूर्नमोजणीचेही काम करण्यात आलेले नाही. गावातील १९९६ पूर्वीचा रेकार्ड उपलब्ध नसल्याने जमीन वाटपाबाबत अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. प्रशासनाने जमिनीची मोजणी करुन शेतकऱ्यांना पट्टे देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रामदास रणविर यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)