शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

स्वातंत्र्यानंतरही मेटेगावचे नागरिक डांबरी रस्त्यापासून वंचित

By admin | Updated: April 26, 2015 01:48 IST

तालुका मुख्यालयापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या व घनदाट जंगलाच्या मध्यभागी वास्तव्यास असलेल्या ...

उदय गडकरी - सावलीतालुका मुख्यालयापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या व घनदाट जंगलाच्या मध्यभागी वास्तव्यास असलेल्या मेटेगावातील १० आदिवासी कुटुंबातील ५७ गावकऱ्यांची ही कहाणी आहे.स्वातंत्र्य पूर्व काळातील मेटेगाव साधनसंपत्तीने समृध्द व वनवैभवाने नटलेले गाव होते. त्या गावात पारंपरिक पद्धतीने लोखंड तयार करण्याचे काम चालायचे. हे परिसरात मिळत असलेल्या दगडांच्या अवशेषांवरून निदर्शनास येते. त्या काळात या गावाची लोकसंख्या ७११ इतकी असल्याची नोंद पोलीस ठाण्यात असल्याचे सांगण्यात येते. मात्र आज केवळ ५७ इतकीच लोकसंख्या असून दहा घरांची वस्ती आहे. परंतु स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांतही या गावाला जाण्यासाठी शासनाकडून रस्ता मिळाला नाही. हे त्या गावाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. जंगलातून पायवाट असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, तर दररोज जंगली श्वापदांचा वावर या गावकऱ्यांमध्ये दहशत पसरवित आहे. दळणवळणाच्या सोईअभावी अचानक उद्भवलेल्या आजारांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.प्रस्तुत प्रतिनिधीने सदर गावाला भेट दिली असता अनेक बाबी उजेडात आल्या. मेटेगाव आज ज्या दयनिय परिस्थितीत आहे, त्याकडे पाहून स्वातंत्रपूर्व काळात या गावांमध्ये लोखंड निर्मिती होत असेल याची कुणी कल्पनाही करु शकत नाही. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी वास्तव्याला असताना तेथे पारंपरिक पद्धतीने लोखंड निर्मिती करण्यात येत असल्याचे निदर्शनात येत आहे. गावाच्या सभोवताल सुमारे अर्धा कि.मी. अंतरापर्यंत तशा प्रकारच्या लोखंड सदृष्य दगडांचे ढीग आढळून येतात. आढळून आलेल्या दगडांबद्दल अधिक माहिती जाणून घेतली असता लोखंड निर्मिती कशा पद्धतीने करायचे याबद्दल गावकरी अनभिज्ञ आहेत. मात्र शुद्ध लोखंडाच्या निर्मितीनंतर उरलेला मळ किंवा कच्चा माल असावा, असे दगडांच्या अवशेषांवरून निदर्शनास येते .आज या गावात आदिवासी समाजाची केवळ दहा घरे असून साध्या प्राथमिक शिक्षणाची सोयही या गावात झाली नाही. अडीच कि.मी. अंतरावर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. परंतु गावाच्या सभोवताल दुसऱ्या गावापर्यंत घनदाट जंगल असल्याने लहान मुलांना शाळेत पाठविणे शक्य नसल्याने गावातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत.