लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: चंद्रपूर मतदारसंघांमध्ये ११ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जनजागृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये निवडणूक साक्षरता क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या निवडणूक साक्षरता क्लबच्यामार्फत एक लाख ५४ हजार विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली आहे.आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी केंद्रीय निवडणूक विभागामार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियान सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील जनजागृती कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या जात आहे.वेगवेगळ्या कार्यक्रमाचे तालुकास्तरावर आयोजन करण्यात येत असून शाळा-कॉलेजच्यामार्फत घराघरात मतदानाच्या संदर्भात जनजागृती केली जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात जनजागृती कार्यक्रमाचे नोडल अधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी जिल्ह्यामध्ये ५१४ निवडणूक साक्षरता क्लबची स्थापना केली आहे.जिल्ह्यातील १५ पंचायत समिती अंतर्गत वर्ग ८ ते १२ पर्यंतच्या सर्व शाळा व सर्व महाविद्यालयातील युवा मतदारांना निवडणूक प्रक्रियेची माहिती प्रभावीपणे देण्यात यावी, यासाठी सदर क्लबची स्थापना करण्यात आली आहे.१८ वर्षाखालील मुलाचा सहभागनिवडणुकीला मतदान करण्यासाठी १८ वर्षाची अट लादण्यात आली आहे. मात्र जे विद्यार्थी निवडणूक प्रक्रियेमध्ये वयाच्या अटीनुसार सहभागी होऊ शकत नाहीत. त्या विद्यार्थ्यांना देखील या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी करण्यातआले असून मतदान करणे किती आवश्यक आहे, हे आपल्या पालकांना समजावून सांगण्याची धुरा त्याच्यावर सोपविण्यात आली आहे. अशाप्रकारे मतदान जागृती करण्यात येत आहे. या साक्षरता क्लबला उत्स्फूर्त असा प्रतिसाद शाळा-कॉलेजमधून मिळत असून यामुळे या वर्षीच्या निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिक मतदानासाठी बाहेर पडतील,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
५१४ निवडणूक साक्षरता क्लबची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 22:40 IST
चंद्रपूर मतदारसंघांमध्ये ११ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जनजागृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये निवडणूक साक्षरता क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या निवडणूक साक्षरता क्लबच्यामार्फत एक लाख ५४ हजार विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली आहे.
५१४ निवडणूक साक्षरता क्लबची स्थापना
ठळक मुद्देजनजागृती कार्यक्रम : एक लाख ५४ हजार विद्यार्थ्यांना माहिती