शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोरपन्यात उपविभागीय कार्यालय स्थापन करा

By admin | Updated: November 26, 2015 00:52 IST

तेलंगणा व यवतमाळ जिल्हा सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय असलेल्या कोरपना येथे तालुका निर्मितीला ....

प्रशासकीय कामाला येणार गती : लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष द्यावे कान्हाळगाव : तेलंगणा व यवतमाळ जिल्हा सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय असलेल्या कोरपना येथे तालुका निर्मितीला २५ वर्षाचा प्रदीर्घ कालखंड लोटूनही जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग वगळता एकाही विभागाचे उपविभागीय कार्यालय स्थापन करण्यात आले नाही. परिणामी संबंधित कामे एकाच ठिकाणी होण्याऐवजी तालुकावासीयांना ससेहोलपट करावी लागत आहे.याठिकाणी महसूल, कृषी, बांधकाम, विद्युत, सिंचाई, पाटबंधारे, पोलीस, डाक, दूरसंचार, पाणीपुरवठा आदी विभागाची उपविभागीय कार्यालय नसल्याने नागरिकांना राजुरा, गडचांदूर, नांदा येथे जावून आपली कामे करावी लागत आहे. यातील काही कार्यालये तालुका मुख्यालयी असण्याऐवजी गडचांदूर, नांदा येथे स्थापन्यात आल्याने एका ठिकाणी होणाऱ्या कामाला दोन चकरा जास्तीच्या माराव्या लागत आहे. पूर्वी कोरपना तालुका हा राजुरा तालुक्यात असल्याचे येथील अनेक उपविभागीय कार्यालये येथे आहे. यात महसूल, कृषी, सिंचाई, पाटबंधारे, डाक, दूरसंचार, वन पाणी पुरवठा आदी उपविभागांचा समावेश आहे. परंतु राजुऱ्याचे अंतर अधिकचे आणि वेळ, आर्थिक बाब खर्ची घालणारी आहे. त्यामुळे ही संपूर्ण कार्यालये स्वतंत्र करुन कोरपन्यात स्थापने गरजेचे आहे. कोरपना तालुका हा आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त, अतिदुर्गम, अविकसित म्हणून ओळखला जात असला तरी औद्योगिकदृष्टया तालुका संपन्न आहे. या कारणाने येथील नागरिकरण झपाट्याने वाढले जात आहे. जेणेकरुन प्रशासकीय कामकाजाला गती प्राप्त होईल. नांदा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे उभारावे गडचांदुरात बांधकाम विभागांनी शाखा अभियंता कार्यालय कायम ठेवावे, अशी मागणी तालुकावासियांकडून व्यक्त होत आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी शर्तीचे प्रयत्न करण्याची गरज आहे. शिवाय याबाबीची त्वरीत पूर्तता झाल्यास कोरपन्याचाही विकास चांगल्यारितीने साधता येईल. नागरिकांच्या विविध समस्या मार्गी लागून अनेकांची होणारी आर्थिक पिळवणूक दूर होण्यास मदत होईल. (वार्ताहर)