शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पुरूष आयोग स्थापन करा

By admin | Updated: September 2, 2015 00:48 IST

पत्नीपीडित पुरूषांना मानसिक आधार देऊन तसेच कायदेशीर मार्गदर्शन करून त्यांचा परिवार विभक्त होण्यापासून वाचविण्याचे काम ..

चंद्रपुरात चर्चासत्र : पत्नीपीडित पुरूषांची मागणीघोडपेठ : पत्नीपीडित पुरूषांना मानसिक आधार देऊन तसेच कायदेशीर मार्गदर्शन करून त्यांचा परिवार विभक्त होण्यापासून वाचविण्याचे काम जिल्ह्यात भारतीय परिवार बचाव संघटना करीत आहे. मात्र त्यांना आधार देण्यासाठी शासनाने राष्ट्रीय पुरूष आयोग स्थापन करण्याची मागणी नंदकिशोर मैंदळकर यांनी केली.रविवारी चंद्रपुरातील आझाद बागेमध्ये संघटनेचे सल्लागार अ‍ॅड. संदीप नागापुरे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहकारी शिक्षणाधिकारी नरेंद्र पिंपळकर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर, डॉ. गुरूदेव गेडाम, सुदर्शन नैताम, विनोद पिसे, दीपक पराते, प्रशांत हजबन, संदीप आत्राम, शीतल साळवे, डॉ. राहुल विधाते आदी उपस्थित होते.सभेत अनेकांनी स्त्री अत्याचाराच्या व्यथा मांडल्या. संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर चर्चासत्रात बोलताना म्हणाले, स्त्री अत्याचाराने समाज ढवळून निघत आहे. त्यामुळे कुटुंब व्यवस्था ढासळू लागली आहे. भारतीय कुटुंब व्यवस्थेची मृत्युघंटा वाजत आहे. हुंडाबळी कायदा ४९८ अ चे भूत प्रत्येक पुरूषाच्या मानगुटीवर बसणार आहे. आजपर्यंत समाजाने स्त्रीला देवीच्या स्थानी बघितले आहे. तिला देवगाय म्हटले आहे व पुरूषाला मारकुंडा सांड. परंतु, आता परिस्थिती बदलली आहे. सर्व्हेनुसार जास्तीत जास्त खटले साध्याभोळ्या निर्व्यसनी पुरूषांवर झालेले आहेत, असे सांगितले.नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) च्या सर्व्हेनुसार २०१४ या वर्षात ६० हजार स्त्री अत्याचारग्रस्त पुरूषांनी आत्महत्या केल्या आहेत. ९८ टक्के स्त्रिया नवरा आपल्या मनासारखा वागत नसल्यास त्याच्यावर केस करतात. त्यांना घरात सासू-सासरे नकोत, जेलमध्ये पाठवेन अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. स्त्रियांच्या बाजूने हुंडाबळीचा कायदा आहे. त्याचा खुळखुळ्यासारखा वापर स्त्रिया करीत आहेत. तो वाजवला की सासरचे सगळे गजाआड. अशा प्रकरणांत स्त्रीच्या बाजूने उभे राहणाऱ्यांची संख्या जास्त असते. पण पुरूष हा एकाकी असतो. त्यामुळे पुरूषाला दाद मागायला जागाच नाही. पुरूषांनाही दाद मागता यावी पुरूष आयोगाची स्थापन करून पुरूषांनाही ४९८ ब हा कायदा बहाल करावा जेणे करून दोषी स्त्रीवरही कारवाई करता येईल, असे नंदकिशोर मैंदळकर यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)