शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या बंदोबस्तासाठी समन्वयक समिती स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 05:00 IST

जिल्ह्यातील जंगलाचा परिसर हा दिवसेंदिवस कमी होत असून नागरिकांचा परिसर वाढत आहे. याठिकाणी इंडस्ट्रीज सुद्धा आहे. त्यामुळे वाघांना या ठिकाणी प्रवेश करणे सोपे जाते. त्यामुळे वन्यप्राणी बफर क्षेत्र ओलांडून या परिसरात येऊ नयेत याची काळजी घ्यावी. तत्पूर्वी ऊर्जामंत्र्यांनी ऊर्जानगर परिसरातील घटनास्थळाची पाहणी केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ऊर्जानगर परिसरात मोठ्या प्रमाणात गवत, झुडपे, काटेरी वनस्पती आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांना लपण्याची जागा असल्याने वन्यप्राण्यांचा वावर आहे. त्यामुळे हे वन्यप्राणी शिकारीकडे वळतात. या परिसरातील खुरपे, झाडे-झुडपे नष्ट करून परिसराची स्वच्छता राखावी. बफर झोनमधील वाघ शहरात येणार नाही यासाठी वनविभागाने उपाययोजना कराव्या, अशा सूचना राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी  दिल्या.हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर येथे सुरक्षा उपाययोजनेसाठी  आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य अभियंता पंकज सपाटे, महावितरणचे मुख्य अभियंता  सुनील देशपांडे,  मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, संचालक प्रशांत खाडे, महापारेषणचे अधीक्षक अभियंता एन.व्ही. किरोलीकर, सुहास जाधव इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे, वनविभागाचे तसेच ऊर्जानिर्मितीचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.जिल्ह्यातील जंगलाचा परिसर हा दिवसेंदिवस कमी होत असून नागरिकांचा परिसर वाढत आहे. याठिकाणी इंडस्ट्रीज सुद्धा आहे. त्यामुळे वाघांना या ठिकाणी प्रवेश करणे सोपे जाते. त्यामुळे वन्यप्राणी बफर क्षेत्र ओलांडून या परिसरात येऊ नयेत याची काळजी घ्यावी. तत्पूर्वी ऊर्जामंत्र्यांनी ऊर्जानगर परिसरातील घटनास्थळाची पाहणी केली. 

या सुचविल्या उपाययोजना- शक्य होत असल्यास वाघांना काॅलर आयडी लावावा.- वाघांना ट्रॅप करण्यासाठी कॅमेरे लावावेत. - रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार करावी. - सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती नेमावी- इंडस्ट्रीज परिसरात सिक्युरिटी टाॅवर उभारावेत.- ऊर्जानिर्मितीने कर्मचाऱ्यांना जाण्या-येण्यासाठी चारचाकी वाहनांची उपलब्धता करून द्यावी.

 

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतforest departmentवनविभाग