शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मूल नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेत त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:29 IST

मूल : मूल शहराला २४ तास पाणीपुरवठा करणारी योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानामधून टंचाईग्रस्त क्षेत्रातून मंजूर झाली आहे. ...

मूल : मूल शहराला २४ तास पाणीपुरवठा करणारी योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानामधून टंचाईग्रस्त क्षेत्रातून मंजूर झाली आहे. सदर योजना पूर्णत्वास आली आहे. सदर योजनेचे कंत्राट मे. लक्ष्मी सिव्हिल इंजि. कंपनी कोल्हापूर यांना देण्यात आले आहे. २८ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या योजनेचा अधिकारी व पदाधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे बट्ट्याबोळ झाला आहे. सदर योजनेचा संपूर्ण निधी खर्च करूनही योजनेत त्रुटी दिसत आहेत, त्या दुरुस्त कराव्यात, अशी मागणी मूल तालुका शिवसेना तालुका प्रमुख नितीन येरोजवार यांनी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना निवेदनाव्दारे केली आहे.

मूल शहरातील जनतेला शुद्ध व मुबलक पाणी मिळावे, यासाठी २८ कोटी रुपये खर्च करुन पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आली. सदर योजना पूर्ण झाल्याचा बनाव करण्यात आला आहे. मात्र योजना पूर्ण झाली तेव्हापासून मूल नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा योग्य पद्धतीने होत नसल्याची जनतेची ओरड सुरू आहे. नळ जोडणी देताना कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले सिमेंट रस्ते तोडण्यात आले. त्यामुळे रस्ते कमकुवत झाले आहेत. २८ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेची चौकशी करण्याची मागणीही नितीन येरोजवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर मूल यांच्यामार्फत केली आहे. याप्रसंगी उपतालुका प्रमुख सत्यनारायण अमरूदिवार, मधुकर पवार, कपिल येलगेलवार, संदीप निकुरे, राहुल महाजनवार, निखिल भोयर, अरविंद करपे, आशिष गुंडोजवार, श्रीनिवास कन्नुरवार व शिवसैनिक हजर होते.