शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती निवडणुकीत बरोबरीचा सामना

By admin | Updated: September 1, 2015 00:50 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रविवारी शांततेत पार पडली. सोमवारी सकाळी स्थानिक राजीव गांधी भवन परिसरात मत मोजणीनंतर...

एकूण १८ जागा : भैया-तिडके गटासह भाजप-काँग्रेस व राष्ट्रवादी युतीलाही नऊ जागाब्रह्मपुरी: कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रविवारी शांततेत पार पडली. सोमवारी सकाळी स्थानिक राजीव गांधी भवन परिसरात मत मोजणीनंतर एकूण १८ जागांवर भैया- तिडके गटाला नऊ तर भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस युतीला नऊ जागा मिळाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचा सामना बरोबरीत रंगला. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन रविवारी ३० आॅगस्टला मतदान प्रक्रीया पार पडली. मतदानापूर्वी भैया-तिडके गट व भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार आमने-सामने उभे ठाकल्याने निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली होती. एकीकडे भाजप व काँग्रेस एकत्र आल्याने बाजार समितीचे चित्र एकहाती पाहायला मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. परंतु भैया व तिडके गटानेही या निवडणुकीत चांगलीच मुसंडी मारल्याने निकालाचे वेगळे चित्र पाहायला मिळाले आहे. मतदानानंतर घोषित झालेल्या निकालानुसार भैया- तिडके गटाचे मापारी गटामधून प्रकाश बुरांडे, सेवा सहकारी संस्था गटातून ऋषी बगमारे, सुरेश दर्वे, दिवाकर मातेरे, सोमेश्वर पत्रे, राजेश तलमले, सेवा सहकारी संस्था महिला राखीव गटातून सुनिता खेमराज तिडके, ग्रामपंचायत गट (आर्थिक दुर्बल गटातून) रणवीर ठाकरे, विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून ब्रम्हदेव दिघोरे विजय झाले आहेत, तर काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे सेवा सहकारी संस्था गटातून नामदेव लांजेवार, वामन मिसार, सेवा संस्था महिला राखीव गटातून सूचित्रा ठाकरे, ईतर मागासवर्गीय गटातून प्रभाकर सेलोकर, अनु. जाती जमाती गटातून प्रमोद मोटघरे, सर्वसाधारण गटातून प्रमोद चिमूरकर, योगेश राऊत तर यापूर्वी व्यापारी गटातून अविरोध निवडून आलेले नितीन उराडे व मुन्ना कावळे असे नऊ उमेदवार विजयी झाले आहेत. दोन्ही गटांना समान जागा मिळाल्याने आगामी सभापती निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या निवडणुकीत आर्थिक दुर्बल घटकातून तालुका काँग्रेस पार्टीचे सचिव थानेश्वर कायरकर पराभूत झाले आहेत. ते यापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत मेंडकी ग्रामपंचायतीतही पराभूत झाले होते, हे विशेष. या निवडणुकीत दोन्ही गटाकडून मतदारांचे भाव वधारले होते. अशी चर्चा मतदानाच्या दिवशी ऐकविण्यात होती. या निवडणुकीच्या निमित्ताने कधी नव्हे एवढी चुरस नागरिकांना पहायला मिळाली. आता बाजार समितीच्या सभापतीपदी कुणाची वर्णी लागते, याकडे ब्रह्मपुरीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)