शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 05:00 IST

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी यंदा महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणस्नेही बाप्पा स्पर्धा घेण्यात येत आहे. यात घरगुती गणेश उत्सव व सार्वजनिक गणेश मंडळांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेचे मूल्यमापन शुक्रवारी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पाच दिवसांपासून पर्यावरणपूरक विसर्जन सुरू आहे. आतापर्यंत एकही पीओपी मूर्ती आढळून आली नाही. १४ सप्टेंबरच्या रात्री १२ अखेरपर्यंत ३ हजार ९५६ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन पार पडले. विसर्जन आपल्या दारी उपक्रमात ६० गणेशभक्तांनी फिरत्या कृत्रिम विसर्जन कुंडांचा लाभ घेतला.चंद्रपूर मनपाच्यावतीने यंदा पर्यावरणपूरक उत्सवावर भर देण्यात आला. त्यासाठी शहरात २७ ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड व १९ निर्माल्य कलश ठेवण्यात आले. झोन क्रमांक १ मध्ये मनपा झोन कार्यालय, संजय गांधी मार्केट नागपूर रोड, डॉ. बाबा आमटे अभ्यासिका,  दाताळा रोड, इरई नदी, तुकुम प्रा. शाळा (मनपा, चंद्रपूर), झोन क्रमांक- २ मध्ये गांधी चौक, लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा पठाणपुरा रोड, समाधी वार्ड, शिवाजी चौक, अंचलेश्वर रोड, विठोबा खिडकी, विठ्ठल मंदिर वाॅर्ड, रामाळा तलाव, हनुमान खिडकी, महाकाली प्राथमिक शाळा, महाकाली वार्ड, झोन क्रमांक ३ मध्ये नटराज टाॅकीज (ताडोबा रोड), सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा बाबुपेठ, मनपा झोन कार्यालय, मूल रोड, बंगाली कॅम्प चौक आदी ठिकाणी कृत्रिम विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. याचा नागरिक लाभ घेत आहेत.

इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धापर्यावरणाच्या संवर्धनासाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी यंदा महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणस्नेही बाप्पा स्पर्धा घेण्यात येत आहे. यात घरगुती गणेश उत्सव व सार्वजनिक गणेश मंडळांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेचे मूल्यमापन शुक्रवारी होणार आहे.

८३० गणेशभक्तांना जास्वंद रोपटे भेटपर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून मनपाच्या कृत्रिम विसर्जन कुंडात विसर्जन करणाऱ्या ८३० गणेशभक्तांना जास्वंदाचे रोपटे आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जात आहे. आतापर्यंत रामाळा तलाव व इरई नदी परिसरामध्ये विसर्जन करण्यासाठी आलेल्यांनी या कृत्रिम कुंडाचा लाभ घेतला.

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव