शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षदिंडीने दिला पर्यावरणाचा संदेश

By admin | Updated: August 13, 2015 01:56 IST

प्रदूषणावर आळा घालण्यासाठी व पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन ...

विद्यार्थ्यांसह गावकरी सहभागी : सामाजिक वनीकरण विभागाचे आयोजनताडाळी : प्रदूषणावर आळा घालण्यासाठी व पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जाणीव जागृती विद्यार्थ्यांमध्ये व जनसामान्यांमध्ये निर्माण होणे काळाची गरज आहे. याच उद्देशाने प्रेरित होवून चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरद्वारा संचालित जनता विद्यालय ताडाळी तथा सामाजिक वनीकरण विभाग चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. यातून पर्यावरणाचा संदेश देण्यात आला.चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात तथा मुख्याध्यापक एम.बी. खुसपरे यांच्या नियोजनात काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीची सुरुवात वृक्षपालखीत ठेवलेल्या वटवृक्षाचे पूजन करुन करण्यात आली.विविध फुलांनी सजविलेली आकर्षक वृक्षपालखी, मराठमोळा पेहराव धारन करुन बॅडच्या तालावर नृत्य करणारे लेझीम पथक, वृक्षकलश, हातात घेऊन ‘एक फुल एक झाड, परिसर करु या हिरवागार’, ‘झाडे लावा प्रदूषणाला पळवा’ असे घोषवाक्य उच्चारणाऱ्या विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले. ग्रामपंचायत ताडाळीच्या प्रांगणात वृक्षपालखी खाली ठेवून हरित गणेश वंदना करण्यात आली. याप्रसंगी सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक कांबळे, लागवड अधिकारी धांडे, सहायक लागवड अधिकारी अमित साळवे, सरपंच ज्योती आसेकर, मुख्याध्यापक खुसपरे यांनी आपल्या उद्बोधनपर भाषणातून वृक्ष आपला सखा आहे. त्याचप्रमाणे परोपकारी बना असा मोलाचा संदेश दिला. या वृक्षदिंडीत गावकरीही सहभागी झाले. (वार्ताहर)