शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

सीपेडच्या चंद्रपूर केंद्रात घडत आहेत उद्योजक

By admin | Updated: May 15, 2016 00:37 IST

सेंट्रल इन्स्टिट्युट आॅफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (सीपेड) अअंतर्गत चंद्रपुरात सुरू असलेल्या ....

प्लास्टिक उद्योगातून रोजगार : ८० प्रशिक्षकांची पहिली बॅच चंद्रपूर : सेंट्रल इन्स्टिट्युट आॅफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (सीपेड) अअंतर्गत चंद्रपुरात सुरू असलेल्या केंद्रातून सध्या गावखेड्यातील तरूण उद्योजक आणि कौशल्यपात्र युवकांना घडविण्याचे काम सुरू आहे. केंद्र सरकारच्या कौशक्ल विकास कार्यक्रमांतर्गत दुर्गापूर वेकोलिच्या इमारतीमध्ये हे केंद्र सुरू असून जिल्ह्याभरातील ८० बेरोजगार युवक येथे प्रशिक्षित होत आहेत.केंद्रीय रसायन मंत्री हंसराज अहीर यांनी शुक्रवारी या प्रशिक्षण केंद्राला भेट दिली आणि सुरू असलेल्या कामकाजाबद्दल माहिती जाणून घेतली. दुर्गापूर वेकोलिच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या या केंद्रातील पहिल्या बॅचमध्ये ८० प्रशिक्षार्थी सहभागी झाले आहेत. जानेवारी महिन्यापासून सुरू झालेली ही बॅच जून महिन्यापर्यंत चालणार आहे. त्यात काही प्रकल्पग्रस्त असून बहुतेक युवक आणि युवती खेड्यातून आले आहेत. सकाळी १०.३० ते सायंकाळी ४ या वेळात दररोज चालणाऱ्या या प्रशिक्षणातून प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या बेसिक कोर्सचे धडे प्रात्यक्षिकासह दिले जात आहेत. त्यासाठी औरंगाबाद येथील सीपेडचे तज्ज्ञ प्रशिक्षक असून प्लास्टिकच्या दाण्यांपासून विविध उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण हे सर्वजण घेत आहेत. या संर्भात माहिती देताना औरंगाबाद केंद्रातील प्रबंधक मिलिंद भरणे म्हणाले, बेरोजगारी अधिक असली तरी त्यांच्या रोजगारासाठी कौशल्याची गरज असते. या केंद्रातून त्यांच्यात कौशल्य निर्माण करण्याचे काम केले जात आहे. प्रशिक्षणानंतर हे युवक कोणत्याही कंपनीत नोकरी करण्यासाठी पात्र ठरतील किंवा स्वत:चा व्यवसाय सुरु करू शकतील, एवढी पात्रता निर्मात केली जाणार आहे. जूनअखेर त्यांच्या रोजगाराच्या दृष्टीने कंपन्यांचे प्लेसमेंट ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. (जिल्हा प्रतिनिधी) देशभरात उघडणार १०० केंद्र - हंसराज अहीरसीपेडचे देशभरात सध्या ४० केंद्र सुरू आहेत. ही संख्या १०० वर पोहचविण्याचा केंदीय रसायन आणि उर्वारक मंत्रालयाचा मानस असल्याची माहिती ना. हंसराज अहीर यांनी भेटीदरम्यान पत्रकारांना दिली. ते म्हणाले, राज्यात केवळ औरंगाबाद आणि त्यानंतर चंद्रपुरात असे दोनच ठिकाणी हे केंद्र सुरु आहेत. जळगावसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. देशात प्रत्येक विभागात एक केंद्र उभारण्याचा विचार मंत्रालयाचा आहे. बंगळुरुनंतर चंद्रपुरात सुसज्ज आणि अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार असून त्यासाठी १५ एकर जागेचा शोध सुरू आहे. प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय अथवा एमआयडीसीजवळ जागा शोधली जात आहे. ही जागा मिळताच कामाला सुरू वात होणार आहे. चंद्रपूर महानगर पालिकेच्या कंपोस्ट डेपोतील वेस्ट मटेरियलमधून प्लास्टिक निर्मित केली जाणार आहे. त्यासाठी एक युनिट डेपोलगत उभारण्याच्या दृष्टीने आयुक्तांशी चर्चा झाली आहे. या सोबतच चंद्रपुरातील आयटीआयमध्येही प्रशिक्षण केंद्राचे एक युनिट उभारले जाणार आहे. चंद्रपूरच्या केंद्रासाठी ५१ कोटी रूपयांचा निधी मंजूर असून केंद्र आणि राज्याने मिळून समान भार उचलावयाचा आहे. बरिक कोर्सनंतर डीप्लोमा कोर्स भविष्यात येथून सुरू होती, त्याचा लाभ उद्योगांना बळकटी येण्यासाठी आणि स्थानिक बेरोजगारांना हमखास रोजगारासाठी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.