शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

गुंठेवारी प्लाटधारकांचे न्यायासाठी प्रशासनाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 01:00 IST

सातबाऱ्यावर फेरफार करुन गुंठेवारी प्लाटधारकांना प्लाट देण्यात यावे, अन्यथा उपविभागी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा संघर्ष समितीने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

ठळक मुद्देनिवेदन सादर : गुंठेवारी प्लाटधारक संघर्ष समिती

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : सातबाऱ्यावर फेरफार करुन गुंठेवारी प्लाटधारकांना प्लाट देण्यात यावे, अन्यथा उपविभागी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा संघर्ष समितीने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.शहरातील सेवानिवृत्त कर्मचारी, सामान्य नोकरदारवर्गाने सन २०१२ मध्ये ब्रह्मपुरी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या भूखंडामध्ये स्वत:चे एक घर असावे याकरिता प्लॉटची खरेदी केली होती. त्याची रीतसर नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालय ब्रह्मपुरी येथे शासकीय नियमानुसार मुद्रांक शुल्क भरून केलेली आहे त्यापैकी काहींनी तलाठी कार्यालय ब्रम्हपुरी येथे फेरफार करिता अर्ज सादर केला असता फेरफार करण्यास नकार दिला. तर काही विक्री केलेल्या प्लॉटधारकांचे फेरफार होऊन सातबारावर सामूहिक नावे आहेत. त्यामुळे ब्रह्मपुरी येथील जवळपास ४०० ते ५०० प्लाटधारक चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे शासनाला न्याय मागण्यांच्या उद्देशाने नागरिकांनी ब्रह्मपुरी गुंठेवारी प्लाटधारक संघर्ष समिती स्थापन केली. या संघर्ष समितीने अनेकदा आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार, आयुक्त, मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, यांना पाठविले. कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.शासनाला न्यायाची मागणी करताना संघर्ष समितीचे अध्यक्ष वि. गो. विखार यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तरीसुद्धा याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे एका महिन्यांच्या आत समस्या सोडविण्यात याव्या, अन्यथा उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा ब्रह्मपुरी गुंठेवारी प्लाटधारक संघर्ष समितीने उपविभागीय अधिकाºयांना निवेदनातून दिला. निवेदन देणाºया शिष्टमंडळात संघर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.