शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

गोवरीवासीयांचा संघर्ष संपेना !

By admin | Updated: May 22, 2014 23:45 IST

वेकोलिच्या कुशीत वसलेल्या गोवरीवासीयांना गेल्या ३० वर्षांपासून पुराचा फटका दरवर्षी बसतो. यात अनेक संसाराची पुराने वाताहत होऊन कुटुंब उघड्यावर येते. पै-पै जोडून उभा केलेला संसाराचा डोलारा

 प्रकाश काळे - हरदोना

वेकोलिच्या कुशीत वसलेल्या गोवरीवासीयांना गेल्या ३० वर्षांपासून पुराचा फटका दरवर्षी बसतो. यात अनेक संसाराची पुराने वाताहत होऊन कुटुंब उघड्यावर येते. पै-पै जोडून उभा केलेला संसाराचा डोलारा क्षणार्धात पुराच्या पाण्यात वाहून जातो. पुराच्या पाण्यातून कुटुंब सावरताना होणारी धडपड नागरिकांच्या काळजाचा ठाव घेणारी असून गोवरीवासीयांचे हा संघर्ष ३० वर्षांनंतरही अजून कायम आहे. राजुरा तालुक्यापासून अवघ्या नऊ कि.मी. अंतरावर वेकोलिच्या कुशीत वसलेले गोवरी हे जेमतेम चार हजार लोकसंख्या असलेले गाव. गावाच्या सभोवताल असलेल्या कोळसा खाणी अगदी गावालगत आहे. सुसज्ज रस्ते गावाच्या विकासाचे प्रतिक मानले जाते. मात्र रस्ते चांगले असणे म्हणजे गावाचा परीपूर्ण विकास झाला, असे आपल्याला म्हणता येणार नाही. गोवरी गावाच्या सभोवताल वेकोलिची कोळसा खाण व मातीचे महाकाय ढिगारे आहेत. वेकोलिने कोळसा उत्खननानंतर मातीचे ढिगारे अगदी नाल्याच्या किनार्‍यावर टाकले आहे. वेकोलिने अनेक नाल्यांची दिशा वळविल्याने अल्पशा पावसाने नाल्याला पूर येतो. गोवरी गाव वेकोलिच्या कुशीत अगदी नाल्याच्या काठावर वसले आहे. त्यामुळे गावकर्‍यांना दरवर्षी पुराचा नाहक फटका बसून पै पै जोडून मोठ्या मेहनतीने उभा केलेला संसार उघड्यावर येतो. पुराच्या पाण्यातून कुटुंबाची सावरासावर करताना डोळ्यात अश्रू येतात. कुटुंब वाचविताना चाललेली धडपड जीवघेणेी असते. पुराच्या पाण्यातून कुटुंबाचा डोलारा सुरक्षित स्थळी हलविताना काळजाची होणारी तगमग गोवरीवासीय गेल्या ३० वर्षांपासून अनुभवत आहे. अनेक घरांची पुरात पडझड होऊन कुटुंब उघड्यावर येते. याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने येथील जाणकारांना विचारणा केली असता पूर्वी गोवरी परिसरातील गावांपेक्षा वेगळे होते. परिसरात कोळशाचे मोठ्या प्रमाणात साठे असल्याने वेकोलिने अगदी गावालगत कोळसा खाणी निर्माण केल्या. त्यामुळे कोळसा उत्खननासाठी शक्तीशाली ब्लॉस्टींगने नवीन इमारतींना अल्पावधीतच तडे जात आहे. वेकोलिने परिसरातील नाल्याची दिशा वळविल्याने अल्पशा पावसाने गोवरी गावात पाणी येते. मात्र गावकर्‍यांच्या हिताचे कोणतेही निर्णय वेकोलिने घेतले नाही. वेकोलिने गावकर्‍यांना आवश्यक सुविधा पुरविणे आवश्यक आहे. वेकोलिकडून गावकर्‍यांसाठी अनेक योजना आहेत. मात्र योजना कुठे गडप होतात कळायला मार्ग नाही. वेकोलिने वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा नफा कमवायचा आणि गावकर्‍यांनी आयुष्यभर वेकोलिच्या दुष्परिणामांना सामोरे जायचे, असा अलिखीत नियम बनला आहे. वेकोलिचे जबाबदार अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही.