शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बिबी पांदण रस्त्याचे अतिक्रमण अखेर दूर

By admin | Updated: April 23, 2017 01:10 IST

गेल्या १० वर्षांपासून वादग्रस्त ठरलेले बिबी पांदण रस्त्यारील अतिक्रमण शेवटी सांमजस्याने

विजया डोहेंचा पाठपुरावा : रामचंद्र चुदरीकडून जमीन दान गडचांदूर : गेल्या १० वर्षांपासून वादग्रस्त ठरलेले बिबी पांदण रस्त्यारील अतिक्रमण शेवटी सांमजस्याने दूर करण्यात आले. या रस्त्यावर झोपड्या बांधून अतिक्रमण करण्यात आले होते. २००८ पासून बिबी पांदण रत्यावर सहा जणांनी झोपड्या बांधून अतिक्रमण करण्यात आले होते. त्याविरोधात नागरिकांनी अनेकदा निवेदन दिले. तसेच उपोषणदेखील केले. हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले होते. तरीही तोडगा निघाला नव्हता. मागील दोन वर्षांपासून नगरसेविका विजया होडे यांनी संमस्याने हे अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न केला. अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु काही आग लावू लोकांनी ते होऊ दिले नाही. त्यामुळे नगरसेविका डोहे व गटनेता नीलेश ताजने यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. त्यांनी उपोषण केल्यावर प्रशासनाने अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अतिक्रमणधारक स्वत: हून अतिक्रमण काढण्यास तयार झाले. त्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून जागा मागितली असता पत्रकार नासीरभाई, कय्यूमभाई, अरुण डोहे यांनी रामचंद्र चुदरी यांची भेट घेऊन प्रत्येकाला ५०० चौरस फूट जागा देण्याची विनंती केली. नासीरभाई यांनी उपविभागीय अधिकारी खिरटकर व ठाणेदार रोकडे, गटनेता नीलेश ताजने, नगरसेविका विजया डोहे, कय्यूमभाई, अरुण डोहे, रामचंद्र चुदरी, नगर परिषदचे अधिकारी, अतिक्रमणधारक यांची बैठक घेतली. तेथे चुदरी यांनी जागेचे बक्षीसपत्र लिहून दिले. ते बक्षीस पत्र अतिक्रमणधारकांना खिरटकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जागा दान दिल्याबद्दल दानकर्ते रामचंद्र चुदरी यांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)