शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरकरांचे संपेना चिखलाचे भोग

By admin | Updated: July 16, 2014 00:04 IST

शहरात करोडो रुपये खर्चांची रस्त्याची कामे केली जात आहे. विलंबाने सुरू झालेल्या या कामांना आता पावसाने खीळ घातली आहे. शहरातील मुख्य मार्ग वगळता अंतर्गत रस्त्याची अवस्था अद्यापही बिकट आहे.

पावसामुळे कामे खोळंबली : नागरिकांच्या नशिबी मनस्तापचचंद्रपूर: शहरात करोडो रुपये खर्चांची रस्त्याची कामे केली जात आहे. विलंबाने सुरू झालेल्या या कामांना आता पावसाने खीळ घातली आहे. शहरातील मुख्य मार्ग वगळता अंतर्गत रस्त्याची अवस्था अद्यापही बिकट आहे. काही ठिकाणी कामे अर्धवट झाली आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही चंद्रपूरकरांचे चिखलाचे भोग संपण्याची चिन्हे दिसत नाही.गेल्या अनेक वर्षांपासून जटपूरा गेट ते रामनगर, तेथून आंबेडकर कॉलेज व पुढे आकाशवाणी मार्गाच्या डांबरीकरणाची नागरिकांना प्रतीक्षा होती. त्याचे काम सुरूही झाले. मात्र रामनगर चौकाचे पुढे हे काम पोहचू शकले नाही. त्यापुढे काही अंतरावर खडीकरण करण्यात आले. मात्र मध्येच पाऊस सुरू झाल्याने कामाचा खोळंबा झाला आहे. त्यातच या भागातील काही लोकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून काही प्रमाणात बांधकाम केले. अतिक्रमीत बांधकाम काढण्यास विरोध झाल्यामुळे काम पुढे सरकेनासे झाले आहे. परिणामी पहिल्याच पावसात या मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून या ठिकाणी दुचाकी वाहनांना अपघात होत आहे. यापेक्षाही भयावह स्थिती आकाशवाणी मार्गाची आहे. या मार्गावर प्रचंड मोठ-मोठे खड्डे पडले असून त्यात आता पाणी साचले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी मोठी कसरत करीत हा मार्गक्रमण करावे लागत आहे. शहरातील शास्त्रीनगर, रेल्वेस्थानक परिसर, भिवापूर वॉर्ड यासह शहरातील विविध भागात रस्त्याची कामे करण्यात आलीत. यातील काही कामे अद्यापही अर्धवट आहेत, तर पूर्ण झालेल्या कामाचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी हे रस्ते उखडले आहेत. स्थानिक गंजवॉर्डात भाजी बाजार परिसरातील रस्ते चिखलमय झाले आहेत. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. मात्र या रस्त्यांचे अद्यापही डांबरीकरण करण्यात आलेले नाही. यासोबतच शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामे पावसामुळे खोळंबली असल्याने नागरिकांना चिखलाचा सामना करावा लागत आहे. या पावसाळ्यात ही कामे पूर्ण होईल की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. (प्रतिनिधी)