शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य महामार्गालगतच्या लेआऊटमधील रस्त्यांवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 23:24 IST

राज्य महामार्गालगत ले-आऊटमधील अंतर्गत रस्ते प्रत्येक ले-आऊटधारकांनी केले आहे. मात्र ले-आऊट मधील १२ मीटरच्या अंतर्गत रस्त्यावर व्यवसायिकांनी पक्के बांधकाम करुन अतिक्रमण केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा: राज्य महामार्गालगत ले-आऊटमधील अंतर्गत रस्ते प्रत्येक ले-आऊटधारकांनी केले आहे. मात्र ले-आऊट मधील १२ मीटरच्या अंतर्गत रस्त्यावर व्यवसायिकांनी पक्के बांधकाम करुन अतिक्रमण केले आहे. त्यामुळे अंतर्गत रस्ते दिसेनासे झाल्याने नागरिक राज्य महामार्गाच्या अंतर्गत रस्त्याचा उपयोग करीत असल्याने अनेक अपघात होवून अनेकांना आपला प्राण गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.नागपूर- चंद्रपूर राज्य महामार्ग वरोरा शहरातील वर्दळीचे समजले जाणारे आनंदवन चौक, रत्नमाला चौक व बोर्डा चौकातून जात आहे. या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ले-आऊट आहे. या ले-आऊटमधील नागरिक थेट राज्य महामार्गावर आल्यास अपघात होऊ शकतो. त्यामुळे अशा ले-आऊट धारकांना १२ मीटरचा अंतर्गत रस्ता सोडून रस्ता तयार करणे बंधनकारक आहे. या नियमानुसार ले-आऊटधारकांनी राज्य महामार्गलगत अंतर्गत रस्ते सोडले आहे. वरोरा शहरातील आनंदवन चौक ते बोर्डा चौकात विनायक ले-आऊट वगळता इतर ले-आऊटमधील अंतर्गत रस्ते शोधूनही सापडत नाही. या अंतर्गत रस्त्यावर मोठ-मोठ्या व्यवसायिकांनी पक्के अतिक्रमण करुन आपला व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे रस्ता असूनही अतिक्रमनामुळे नागरिकांना जाता येत नाही.त्यामुळे नागरिकांना राज्य महामार्गाच्या अंतर्गत रस्त्याचा आधार घ्यावा लागतो. आनंदवन चौक ते बोर्डा चौक या रस्त्यादरम्यान मोठ्या प्रमाणात जड वाहनाची वर्दळ असल्याने नागरिक महामार्गाच्या अंतर्गत रस्त्याची निवड करतात. त्यामुळे याही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ असल्याने अनेकदा अपघात झाले आहे. त्यात काहींचा मृत्यू तर काही कायमचे अपंग झाले आहे. राज्य महामार्गालगत ले-आऊटमधील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासन पुढे येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.