शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

चौकातील अतिक्रमण धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:40 IST

शहरातील रस्ते आधीतच अरुंद आहेत. दोन वाहने आली तरी नागरिकांचा कोंडमारा होतो. येथील टिपू सुलतान चौक अतिशय वर्दळीचा असून मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे नागरिकांची डोकेदु:खी वाढली.

ठळक मुद्देअपघाताच्या घटना वाढल्या : कारवाई कधी होणार ?

मनोज गोरे ।ऑनलाईन लोकमतकोरपना: शहरातील रस्ते आधीतच अरुंद आहेत. दोन वाहने आली तरी नागरिकांचा कोंडमारा होतो. येथील टिपू सुलतान चौक अतिशय वर्दळीचा असून मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे नागरिकांची डोकेदु:खी वाढली. हा चौक जणू मृत्यूचाच सापळा झाल्याचे संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे़कोरपना शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. शाळा, महाविद्यालय, आरोग्यकेंद्र, औद्योगिक संस्थामुळे वाहनाची संख्या वाढली. जिल्हा व अन्य तालुक्यांशी संपर्क वाढल्याने दिवसभरात शेकडो वाहने शहरात येतात. यवतमाळ, आदिलाबाद व चंद्रपूर येथून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांची संख्या चिंताजनक झाली आहे. शहरातील मुख्य वर्दळतीचे ठिकाण असलेल्या टिपू सुलतान चौकातून बरीच वाहने वळसा घेतात. याच मार्गावर काही मोठ्या दुकानदारांनी दुकाने थाटली. शिवाय दुकानांसमोरील सरकारी जागा अन्य लहान व्यवसायिकांना देवून खोऱ्याने पैसे मिळवित आहे. फळ विक्रेते, पानठेले, खासगी प्रवासी वाहतूक आणि अन्य किरकोळ व्यवसायिकांना नाईलाजास्तव या चौकातूनच कारभार हाकावा लागत आहेत. त्यामुळे चौकात दिवसभरात प्रचंड गर्दी असते. पादचाºयांना येथून वाट काढताना जिवाची कसरत होते़ हा सर्व प्रकार दिवसेंदिवस वाढत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक प्रशासनातील संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमणांकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष केले. पोलीस प्रशासनानेही कारवाईचा बडगा उगारला नाही. परिणामी, या चौकात दिवसेंदिवस अपघात होत आहेत.पोलीस प्रशासनाने या चौकात शिपाईची नियुक्ती केली नाही. वाहतूक नियमाचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. टिपू सुलतान चौकात चारही बाजूने लहानमोठ्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले. हे अतिक्रमण हटविण्याचे धाडस अजूनही अद्याप कोणी केले नाही. याला कारण काय, असा सवाल नागरिक विचारीत आहे. आठवडी बाजारात दुकाने लावण्यासाठी बरीच मोठी जागा आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून विकासाचे नियोजन करणे गरजेचे आहे. केवळ राजकीय हिशेब पुढे ठेवून लोकप्रतिनिधी गप्प बसत असल्याने या चौकातील अतिक्रमण सर्वसामान्य नागरिकांसाठी धोकादायक ठरले आहे.शहराच्या विकासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. त्यामुळे नागरिक सुविधा पूर्ण करताना दीर्घकालीन योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. यामध्ये शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते़ मात्र आजपर्यंतचा अनूभव लक्षात घेता यासाठी कोणत्याच हालचाली सुरु नसल्याने कोरपना येथील समस्या वाढतच आहेत़शहरातील अतिक्रमणाला अभय कुणाचे ?कोरपना शहरातील टिपू सुलतान चौकासोबतच अन्य मार्गांवरही मोठ्या प्रत्तमणात अतिक्रमण झाले आहे़ हे अतिक्रमण हटवून रस्त्याचे रुंदीकरण केल्यास शहराचा चेहरामोहरा बदलू शकतो. बाजारपेठ, शहरातील लहान दुकाने आणि सार्वजनिक संस्थाना चांगली शिस्त लागू शकते. परंतु लोकप्रतिनिधींनी हा विषय अद्याप गांभिर्याने घेतलाच नाही. तर दुसरीकडे अतिक्रमणाला अभय दिले जात आहे.