शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालयाच्या क्वॉर्टरवर अतिक्रमण

By admin | Updated: July 16, 2014 00:06 IST

शहरातील इंदिरानगर परिसरातील तहसिल कार्यालयाच्या मालकीची जागा व क्वॉर्टरवर अतिक्रमण करण्यात आले आहे. एक कोटीच्यावर किंमत असलेली जागा व क्वॉर्टर शासकीय संपत्ती आहे.

राजुरा : शहरातील इंदिरानगर परिसरातील तहसिल कार्यालयाच्या मालकीची जागा व क्वॉर्टरवर अतिक्रमण करण्यात आले आहे. एक कोटीच्यावर किंमत असलेली जागा व क्वॉर्टर शासकीय संपत्ती आहे. त्याचेच संरक्षण शासकीय अधिकारी करू शकत नाही तर, इतर नागरिकांच्या संपत्तीचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.राजुरा शहरामध्ये मागील ४० वर्षांपासून राजुरा तहसील कार्यालयाच्या मालकीचे क्वॉर्टर आहे. या ठिकाणी तहसिल कार्यालयाचे कर्मचारी राहत होते. परंतु सर्व कर्मचाऱ्यांनी क्वॉर्टर सोडून आपआपली घरे बांधली. काही किरायणे राहत आहे. त्यामुळे हे क्वार्टर पूर्ण रिकामे होते. याच संधीचा फायदा घेऊन येथील नागरिकांनी शासकीय क्वॉर्टरमध्ये अतिक्रमण करून वास्तव्य करीत आहे. शहरातील शेकडो एकर शासकीय जमिनीवर अनेक धनधाडंग्याचे अतिक्रमण झाले आहे. परंतु शासकीय यंत्रणा लुळी पांगली झाली आहे.राजकीय दबावाखाली तहसिलदार काम करतात असा आरोप होत आहे. शासकीय जमीन ज्याची किंमत करोडोमध्ये आहे. अतिक्रमण काढण्यात कुणीही धजत नाही.राजुरा शहरामध्ये शासकीय जमिनी ज्या संस्थांना वाटप झालेले आहे. काहींनी तर शासकीय जमिनी ज्या उदरनिर्वाहासाठी शासनाने दिल्या त्याच जमिनी विकून टाकल्या. शहरातील वैभवशाली तलावाच्या जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. तलावाचा जुना नकाशा काढल्यास अतिक्रम समजेल. राजुरा शहरातील १४९ सर्वे क्रमांकामध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय जमिनीवर अतिक्रमण झाले आहे.काही शासकीय जमिनीच्या रजिस्ट्र्यासुद्धा झाल्या आहे. राजुरा शहरात पैशासाठी वाट्टेल ते करायला येथील काही लोक तयार असून ‘पैशामुळे आम्ही अधिकारी विकत घेतो’ या गुर्मीत वागत आहे. याची गुर्मी उतरवणारा अधिकारी मात्र अजुनपर्यंत शहरात आला नाही, ही मोठी शोकांतिका आहे.शहरात जी संपत्ती शासनाची आहे तेच वाचविण्यात शासकीय अधिकारी अपयशी झाले ते दुसऱ्याच्या संपत्तीचे काय संरक्षण करणार त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये अधिकाऱ्याप्रती असंतोष निर्माण झाला आहे. शासकीय जमिनी, शासकीय क्वॉर्टर वाचविण्यासाठी आता जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनाच राजुराकडे लक्ष देण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)