शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटीच्या शासकीय जागेवर अतिक्रमण

By admin | Updated: May 27, 2015 23:58 IST

राजुरा शहरातील सर्वे क्रमांक १४९ मध्ये शासकीय जमिनीची निव्वळ लूट चालू असून शासकीय अधिकाऱ्यांच्या .....

तक्रारीनंतरही कारवाई नाही : तत्कालीन पालकमंत्र्यांच्या पत्राला जिल्हाधिकाऱ्यांकडून केराची टोपलीबी. यू. बोर्डेवार राजुराराजुरा शहरातील सर्वे क्रमांक १४९ मध्ये शासकीय जमिनीची निव्वळ लूट चालू असून शासकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे करोडोची जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात जात आहे. विधायक कामासाठीसुद्धा जागा उपलब्ध होत नाही. शिवाजी नगरातील ५०० रुपये वर्गफूट किंमत असलेल्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण झाले असून जवळपास २० हजार फूट जागा ही खाजगी व्यक्तीनी अतिक्रमण करुन घरे बांधली आहे. नगर पालिकेने विकासाची कामे केली. सरकारी जागेवर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता काम करुन नगर पालिकेनेसुद्धा जमिनी अतिक्रमण करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले.शिवाजी वॉर्डातील या २० गुंठे जागेची राजुरा येथील पंचशिल शिक्षण संस्थेने अनुसूचित जाती जमातींच्या मुलीसाठी वसतिगृह बांधण्यासाठी मागणी केली होती. त्यामुळे तहसीलदार यांच्या पत्रानुसार भूमी अभिलेख कार्यालयाने रक्कम भरुन मोजणी करुन दिली. नगर परिषद राजुरा आणि वन विभाग राजुरा यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले. शासकीय जमिनीची लोकहिताकरिता मागणी असूनदेखील वैयक्तिक लाभासाठी होत असलेल्या अतिक्रमणावर कोणतीच कारवाई शासन करीत नाही, ही मोठी शोकांतीका आहे. या संस्थेचे सर्व सोपस्कार आटोपून जिल्हाधिकारी कार्यालयात फाईल पोहोचतपर्यंत शिवाजी नगरातील या जागेवर अतिक्रमण सुरु झाले. या पंचशिल संस्थेने जानेवारी २०१३ मध्ये सर्वे क्रमांक १४९/ १ मधील मागणी केलेल्या २० गुंठे जागेवर अतिक्रमण होत असल्याचे प्रशासनाला लेखी कळविले. मात्र अतिक्रमण होत असताना नगर पालिका आणि शासकीय अधिकारी यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे सदर जागा अतिक्रमणधारकांनी बळकावली. याबाबत चंद्रपूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा पर्यावरण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना ११ फेब्रुवारी २०१३ ला पत्र दिले. पंचशिल शिक्षण संस्था मुलींच्या वसतिगृहासाठी जागा मागत आहे. या संस्थेतर्फे वसतिगृह भाड्याच्या खोलीमध्ये आहे.जागा मिळाल्यास या तालुक्यातील गरीब आदिवासींच्या मुलींना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होईल. परंतु मंत्र्यांच्या पत्राला केराची टोपली जिल्हाधिकारी कार्यालयाने दाखविली आणि याबाबत कुठलाच निर्णय घेतला नाही. राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनीसुद्धा ११ जानेवारी २०१३ ला जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पत्र लिहून या संस्थेच्या लोकहिताच्या कार्यासाठी जागा उपलब्ध देण्याबाबत कळविले होते. सर्व होत असताना राजुरा शहरात शिवाजी नगर वॉर्डातील या जागेवर अतिक्रमण सुरुच होते. राजुरा नगर पालिका आणि शासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेतली असती तर ही एक करोडची शासकीय जमीन वाचू शकली असती. या संस्थेला जागा दिली असती तर गरिबांच्या शंभर मुली राजुऱ्याला शिक्षणासाठी राहिल्या असत्या. मात्र या जागेवर अतिक्रमण झाले. हे अतिक्रमण हटविण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर आहे. या संदर्भात जबाबदारी झटकणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार कर्तव्यदक्ष आहेत. मग राजुराकडे लक्ष द्यावे व करोडोची शासकीय संपत्ती लुटणाऱ्या या टोळ्यावर नियंत्रण आणावे, शासकीय जमीन विकणाऱ्या एजंटावर लक्ष केंद्रीत करुन कारवाई करावी. दारूबंदीनंतर आता अतिक्रमणाचा ज्वलंत प्रश्न मुनगंटीवारांनी हाताळावा, अशी मागणी राजुरावासीयांनी केली आहे.