शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिचे मुख्य मार्गावर अतिक्रमण

By admin | Updated: June 25, 2014 00:23 IST

वेकोलिच्या गोवरी व पोवनी खुल्या कोळसा खाण परिसरातून जाणाऱ्या राजुरा गोवरी- पोवनी मार्गावर पवनी नाल्याजवळ वेकोलिने आपल्या सोईनुसार मोठी नाली खोदून त्या नालीची माती रहदारीच्या हद्दीत टाकली.

सास्ती : वेकोलिच्या गोवरी व पोवनी खुल्या कोळसा खाण परिसरातून जाणाऱ्या राजुरा गोवरी- पोवनी मार्गावर पवनी नाल्याजवळ वेकोलिने आपल्या सोईनुसार मोठी नाली खोदून त्या नालीची माती रहदारीच्या हद्दीत टाकली. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्तत केला आहे.पावसाळ्यात या नालीत व नाला परिसरात पाणी साचून दलदल निर्माण होऊन रस्ता पूर्णपणे खराब होतो. नाली खोदून रहदारी हद्दीत माती टाकल्यामुळे रस्त्यावर चिखल पसरुन वाहतुकीस अडचण निर्माण होणार आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षततेमुळे वेकोलिने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरच अतिक्रमण केले आहे.राजुरा तालुक्यात वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत. वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गोवरी व पोवनी खुल्या कोळसा खाण परिसरातून राजुरा- गोवरी- पोवनी - कवठाळा हा मुख्य मार्ग जातो. या मार्गाने वेकोलिची मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक सुरु असते. त्यामुळे या रस्त्याची नेहमी दुरवस्था असते. याकडे वेकोलि व सार्वजजनिक बांधकाम विभागही पाहिजे तसे लक्ष देत नाही. त्यामुळे या मार्गावरुन वाहतूक करणाऱ्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. दुरुस्तीच्या नावावर मात्र अनेकदा या रस्त्यावर काम सुरु असते. दुरुस्ती निकृष्ठ दर्जाची केली जात असल्यामुळे रस्त्या कधीच सुस्थितीत दिसून येत नाही. वेकोलिने खाण परिसरातून वाहणारे नाले आपल्या सोयीनुसार वळविले. वळविलेल्या नाल्याचे पाणी खाणीत जाऊ नये, याकरिता पोवनी गावालगत असलेला नाल्याचे तसेच इतर पाणी गोवरी ते पोवनी दरम्यानच्या खोलगट भागात असलेल्या पुलाच्या दिशेने वाहून जाण्याकरिता या परिसरातून जाणाऱ्या राजुरा- गोवरी- पोवनी- कवठाळा या रस्त्याच्या अगदीच कडेला मोठी नाली खोदली. त्या नालीची माती याच रस्त्याच्या रहदारी हद्दीत टाकण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होऊन वाहतुकीस अडचण निर्माण होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरुन वेकोलिची मोठी वाहतूक होत असून रस्ते खराब होतात. त्यामुळे वेकोलि परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करण्याऐवजी वेकोलिने रस्त्यावरच अतिक्रमण करुन माती टाकून व नाली खोदून रस्ता खराब करीत आहे. याबाबत नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. (वार्ताहर)