शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

फुटपाथवर अतिक्रमण; महापालिका प्रशासन निद्रिस्त

By admin | Updated: January 3, 2015 22:59 IST

शहरातील रस्त्यावर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बांधण्यात आलेल्या फुटपाथवर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले. त्यामुळे नागरिकांना मुख्य रस्त्याच्या काठावरून चालावे लागत आहे.

चंद्रपूर : शहरातील रस्त्यावर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बांधण्यात आलेल्या फुटपाथवर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले. त्यामुळे नागरिकांना मुख्य रस्त्याच्या काठावरून चालावे लागत आहे. यातून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या गंभीर विषयाकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले. त्यानंतरही महापालिका प्रशासनाने कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. दुसरीकडे, पालिकेने या प्रकाराकडे गंभीरतेने लक्ष देऊन दोन दिवसांत अतिक्रमण हटविले नाही तर आम्हीच रस्त्यावर उतरून अतिक्रमण हटवू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. फुटपाथवरील अतिक्रमणाबाबत मनपाची नेमकी काय भूमिका आहे, हे जाणून घेण्यासाठी शनिवारी पुन्हा मनपाचे आयुक्त सुधीर शंभरकर यांच्याशी वारंवार दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी सायंकाळपर्यंत फोनच उचलला नाही. मुख्य मार्गावरून सुरक्षित चालता यावे, यासाठी शहरातील सर्वच प्रमुख मार्गावर महानगर पालिकेच्यावतीने फुटपाथ तयार करण्यात आले. त्याला लोखंडी रेलिंगदेखील लावण्यात आले. मात्र काही दिवसांतच व्यापाऱ्यांनी या फुटपाथवर अतिक्रमण केले. फुटपाथवरच विक्रीचे साहित्य ठेवण्यात येत असल्याने नागरिकांना तेथून चालणे कठिण झाले आहे. एखाद्या सामान्य नागरिकाने यावर आक्षेप घेतल्यास संबंधित व्यापारी त्या नागरिकालाच धमकावतो. अशा अनेक घटना आजवर घडल्या आहेत. अतिक्रमणामुळे हे फुटपाथ अनेक ठिकाणी तुटले आहेत. त्यामुळे फुटपाथवरून चालताना जेथे ते फुटले आहे, त्याला वळसा घालत रस्त्यावर व पुन्हा फुटपाथवर यावे लागते. चंद्रपूर शहरातील नागरिक अशी कसरत दररोजच करीत आहेत. याची जाणिव असतानाही महानगर पालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे. महानगर पालिकेत अतिक्रमण या विषयासाठी स्वतंत्र विभाग आहे. झोनल आॅफीसरदेखील नेमले आहेत. मात्र या अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांकडून ठराविक रकमेचे पाकीट दरमहा दिल्या जात असल्याने या अधिकाऱ्यांनी आपल्या डोळ्यावर पट्टया चढवून घेतल्या आहेत. शनिवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच, अनेक नागरिकांनी ‘लोकमत’च्या कार्यालयात दूरध्वनी करून आभार मानले. फुटपाथवर व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणाबाबत संताप व्यक्त केला. महानगर पालिका जर या विरुद्ध कारवाई करीत नसेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही अनेकांनी दिला. एकूणच या विषयात आता मनपा काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)