शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

उर्दू प्राथमिक शाळेला अतिक्रमणाचा विळखा

By admin | Updated: August 12, 2016 01:14 IST

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत प्रत्येक जाती धर्माच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी वरोरा शहरात नगर परिषदतर्फे प्राथमिक शाळा सुरू आहेत.

वरोरा नगरपालिकेचे दुर्लक्ष : विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो त्रास वरोरा : सर्व शिक्षा अभियान अंतर्गत प्रत्येक जाती धर्माच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी वरोरा शहरात नगर परिषदतर्फे प्राथमिक शाळा सुरू आहेत. मात्र त्यातील उर्दू प्राथमिक शाळा ही नगरसेवकांच्या व पदाधिकारांच्या दुर्लक्षतेमुळे अनेकांना ही आपलीच मालमत्ता असल्याचे वाटायला लागले आहे. या शाळेसमोर काहींनी अतिक्रमण करून जागा बळकावली आहे. मात्र याकडे नगरपरिषद बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, स्वछता विभाग व पोलीस प्रशासनही लक्ष द्यायला तयार नाही. काही नगरसेवकांनी अतिक्रमणाबाबत सभेत विषय मांडला तरी त्या विषयावर चर्चा होत नाही. आपला पाल्य हा शिकला पाहिजे, मोठा अधिकारी किंवा मोठा व्यावसायिक झाला पाहिजे, हे प्रत्येक पालकाला वाटत असते. पण आर्थिक परिस्थीती आणि महागाईमुळे काही पालक आपल्या पाल्यांना नगरपरिषदेच्या शाळेमध्ये पाठवतात. हातावर आणून पानावर खाण्याची परिस्थिती असणारे बहुसंख्य गरीबांचे मुले कधी अनवाणी पायाने तर कधी फाटलेले कपडे घालून का होईना, दररोज शाळेत हजेरी लावतात. ज्या शाळेत मुले शिक्षण घेतात त्या शाळेत जायला रास्ता नाही, पटांगण आहे पण पाऊस आला तर पटांगणाला स्विमिंग पुलाचे स्वरूप येते. शहरात नगरपरिषदेच्या नाकर्तेपणामुळे मोडकळीस आलेल्या अनेक शाळा आहेत. पण शहरातील मुख्य चौकातील म्हणजे नेहरू चौकातील उर्दू प्राथमिक शाळा हे चांगलेच उदाहरण आहे. अनेक मुस्लिम बांधवांचे पाल्य या शाळेत विद्याग्रहण करायला येतात. परंतु, शाळेच्या सुरक्षा भिंतीच्या काही अंतरावरच दुकाने असावे असा नियम असताना शाळेलाच लागूनच काही अवैद्य दारू विक्रेते दारू विक्रीचा व्यवसाय करतात. सट्टापट्टी घेणाऱ्यांची व लावणाऱ्यांची गर्दी या परिसरात नेहमीच असते. अतिक्रमणमुळे विध्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून शाळेसमोर असणारे चिखल, कचरा, पाणी साचलेले आहे. एकीकडे स्वच्छतेच्या नावावर दुसरा क्रमांक पटकविणारी नगरपरिषद आणि दुसरीकडे स्वच्छतेच्या नावावर लखपती बनलेले ठेकेदार यांना शाळेसमोरचे चित्र दिसत नसावे. त्यामुळे परिसरात स्वच्छतेचे बारा वाजल्यासाचे चित्र पाहावयास मिळत आहे. शाळेसमोर हा सर्व प्रकार सुरु असताना वरोऱ्यातील राजकीय पक्ष गप्प का, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहे .त्यामुळे या समस्येकडे लक्ष देऊन परिसरात स्वछता आणि बेकायदेशीर अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत . (शहर प्रतिनिधी)