शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

सर्वांगीण विकासाकरिता भावी पिढी सक्षम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:06 IST

गावातील लहान मुले उद्याचे भावी नागरिक आहेत. त्यामुळे मुलांना सर्वांगाने सक्षम केल्यास गावाचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

ठळक मुद्देजितेंद्र पापळकर : पिपर्डा गावात स्वच्छता महोत्सव

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : गावातील लहान मुले उद्याचे भावी नागरिक आहेत. त्यामुळे मुलांना सर्वांगाने सक्षम केल्यास गावाचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. कोरपना तालुक्यातील पिपर्डा गावात आयोजित स्वच्छता महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.स्वच्छता महोत्सवाचे प्रास्ताविक कोरपना पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते पार पडले. तर अध्यक्षस्थानी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र मोहिते, सामाजिक कार्यकर्ता सय्यद आबिद अली आदी उपस्थित होते.पापळकर पुढे म्हणाले, मुलांचा विकास करावयाचा असेल, तर स्वच्छतेच्या सवयीसह कुपोषणमुक्त ग्राम होणे गरजेचे आहे. यासोबतच स्पर्धेच्या युगात गावातील तरुण समोर येण्यासाठी तरुणांना वाचणाची सवय लावली पाहिजे. वाईट व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. उज्वल जीवन घडविण्यासाठी लहान पणापासूनच चांगल्या सवयीचा स्विकार केला पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच पिपर्डा गावातील शाश्वत स्वच्छता, गुडमार्निंग पथकासह गावात राबविलेल्या सर्व उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आ. संजय धोटे यांनी जीवनमान उंचावण्याकरिता सर्वांनी स्वच्छता राखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोहिते म्हणाले, सकारात्मक दृष्टीने सर्वांनी विचार केल्यामुळेच आज गावात शाश्वत स्वच्छता निर्माण झाली आहे. पुढेही गावकऱ्यांनी असेच कार्य करावे.यावेळी नायब तहसीलदार मडावी, कृषी अधिकारी देवनाडे, स्वच्छ भारत मिशनचे माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ कृष्णकांत खानझोडे, पिपर्डा ग्रामपंचायतचे सरपंच चंद्रभान मडावी, धानोली ग्रामपंचायतचे सरपंच विजय रणदिवे, विस्तार अधिकारी जिवन प्रधाण, प्रविण मस्के, खुशाल राठोड, नगरसेवक सोयल अली, रमेश मालेकर उपस्थित होते.यावेळी गावात शाश्वत स्वच्छता राखणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा व गुडमार्निग पथकाच्या तरुणांचा सत्कार करण्यात आला. संचालन व आभार सय्यद आबिद अली यांनी मानले.