शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाने कार्यालये रिकामी

By admin | Updated: August 5, 2014 23:42 IST

राज्य महसूल कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाला तहसील तसेच नायब तहसीलदार संघटनेने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यांत महसूल विभागाची यंत्रणा कोलमडली आहे. महसूल दिनापासून

चंद्रपूर : राज्य महसूल कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाला तहसील तसेच नायब तहसीलदार संघटनेने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यांत महसूल विभागाची यंत्रणा कोलमडली आहे. महसूल दिनापासून सुरु झालेल्या या संपामुळे विविध लोकोपयोगी कामे पूर्णत: बंद पडले आहे. विशेष म्हणजे, संपाच्या दिवशी चिमूर येथील तहसीलदारांच्या कक्षापुढे चक्क कुत्रे आराम करत असल्याचे चित्रही बघायला मिळाले.महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरु झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर परिणाम झाला आहे. १६ ते २० आॅगस्ट दरम्यान आचार संहिता लागण्याची चिन्हे दिसत असल्याने राजकीय पक्षांचेदौरे वाढत आहे. मात्र निवडणुकीची प्रशासकीय तयारी मागे पडलेली आहे. पीक सर्वेक्षण, नैसर्गिक आपत्ती निवारण व मदत, सूवर्ण जयंती राजस्व अभियान या सारख्या योजनांचा बट्ट्याबोळ झाला आहे. शालेय प्रमाणपत्र, शपथपत्राची कामे पूर्णत: खोळंबलेली असल्याने पालकवर्ग चिंतीत आहे. जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये व जिल्हा कार्यालयसुद्धा ओस पडले आहे. या संपात जिल्हा व तालुकास्तरावर कर्मचारी सरकारविरोधी निदर्शने करीत आहे. आंदोलनांत संपूर्ण राज्यात सरासरी २८ हजार कर्मचारी संपावर असून जिल्ह्यातील ९५० कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने नायब तहसीलदार, अव्वल कारकून कनिष्ठ लिपीक, शिपाई व कोतवाल संवर्गाचा समावेश आहे.महसूल कर्मचारी संघटनेने शासनाला दिलेल्या निवेदनानुुसार, नायब तहसीलदारांचा ग्रेड पे वाढविणे, कनिष्ठ लिपीकाचे पदनाम बदलविणे, कोतवालांना चतुर्थश्रेणीचा दर्जा देणे व वर्ग - ४ मधील कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास नोकरीत सामावून घेणे यासारख्या एकूण २६ मागण्यांचा समावेश आहे. ४ आॅगस्टपासून तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने केलेल्या मागण्यांच्या समर्थनाथ संपात उतरले आहेत. चंद्रपूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले. त्यांनी याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात नायब तहसीलदार विलास वानखेडे यांच्यासह जिल्हा संघटनेचे राजू धांडे, शरद मसराम, सुनील तुंगिडवार, मनोज आकनुरवार, प्रविण चिडे आदींचा समावेश होता. (नगर प्रतिनिधी)