शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थांच्या माध्यमातून तीनशे व्यक्तींना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:25 IST

नागभीड : नागभीड तालुक्यात उद्योगांची वानवा असली तरी सहकारी पतसंस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणावर विणल्या गेले आहेत. सव्वा लाख लोकसंख्या ...

नागभीड : नागभीड तालुक्यात उद्योगांची वानवा असली तरी सहकारी पतसंस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणावर विणल्या गेले आहेत. सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या या तालुक्यात आतापर्यंत १८ पतसंस्थांची स्थापना झाली आहे आणि या पतसंस्थांच्या माध्यमातून तालुक्यात सुमारे तीनशे व्यक्तींना रोजगारही प्राप्त झाला आहे.

नागभीड तालुका उद्योग विरहित आहे. या तालुक्यात मोठेच काय छोटेही उद्योग नाहीत. असे असले तरी या तालुक्यात सहकारी पतसंस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणावर तयार होत आहेत. तालुक्याच्या सहकार क्षेत्रात पूर्वी नागभीड तालुक्याचे नाव अग्रक्रमावर होते. अनेक सहकारी दूध संकलन संस्था, भातगिरण्या, ग्रामोद्योग मंडळ, सहकारी संस्था सहकारी तत्त्वावर संचालित केल्या जायच्या. मात्र काळाच्या ओघात यातील काही संस्था तग धरू शकल्या नाहीत. काही संस्था मात्र अद्यापही तग धरून आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या २०-२५ वर्षात या सहकारी पतसंस्थांनी तालुक्यात आपली पाळेमुळे चांगलीच रोवली आहेत. या पतसंस्थांच्या माध्यमातून शेकडो तरूण रोजगाराला लागले आहेत.

बॉक्स

पहिली पतसंस्था १९९२ मध्ये आली

नागभीड तालुक्यात प्रथमतः स्वामी विवेकानंद या पतसंस्थेच्या माध्यमातून १९९२ मध्ये पतसंस्थांची पायाभरणी झाली. आणि तेथून पतसंस्थांचा प्रवाह या तालुक्यात सुरू झाला. त्यानंतर एकामागून एक अशा पतसंस्था स्थापन झाल्या. अगोदर सर्वसमाशक असलेल्या या पतसंस्था नंतर समाजाच्या व जातीच्या नावावरही स्थापन झाल्या. या पतसंस्थांचा व्यावहारिक हिशेब काढला तर यातील अनेक पतसंस्था नफ्यापेक्षा तोट्यातच असाव्यात, अशी चर्चा वर्तुळात आहे. यात आणखी उल्लेखनीय बाब अशी की व्यवहार मोठे असलेल्या बाहेरच्या मोठ्या पतसंस्थांनी येथे आपल्या शाखाही सुरू केल्या आहेत. तर येथील एका पतसंस्थेने तालुक्यात इतर ठिकाणी शाखा सुरू केल्या आहेत.

बॉक्स

नागभीड शहरात आठ पतसंस्था

आज नागभीडचा विचार केला तर नागभीडची लोकसंख्या १५ हजाराच्या आसपास आहे. १५ हजार लोकसंख्या असलेल्या या नागभीडमध्ये आठ पतसंस्था आहेत. शहराबाहेरील एका पतसंस्थेने येथे आपली शाखा सुरू केली आहे. तालुक्याचा विचार केला तर तालुक्याची लोकसंख्या सव्वा लाखाच्या जवळपास आहे. सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या या तालुक्यात १८ पतसंस्था पतसंस्था कार्यरत आहेत.