शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमीतून ५२ हजार मजुरांना काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:55 IST

मंगेश भांडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: गतवर्षीच्या कोरड्या दुष्काळामुळे यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीत वाढ झाली. ग्रामिणांचे कामाच्या शोधात स्थलांतर होत आहेत. अशातच आर्थिक अडचणींमुळे मिळेल ते काम करण्यास मजुरांची धावपळ सुरू असताना ग्रामपंचायत स्तरावरील रोहयो कामांमुळे मजुरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मजुरांच्या मागणीवरून प्रशासनाने जिल्ह्यातील ३८० ग्रामपंचायतीमध्ये सध्या १ ...

ठळक मुद्दे४४७ ग्रामपंचायतींची कामे सुरू करण्याकडे दुर्लक्षजिल्ह्यात १ हजार २१० कामे

मंगेश भांडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: गतवर्षीच्या कोरड्या दुष्काळामुळे यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीत वाढ झाली. ग्रामिणांचे कामाच्या शोधात स्थलांतर होत आहेत. अशातच आर्थिक अडचणींमुळे मिळेल ते काम करण्यास मजुरांची धावपळ सुरू असताना ग्रामपंचायत स्तरावरील रोहयो कामांमुळे मजुरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मजुरांच्या मागणीवरून प्रशासनाने जिल्ह्यातील ३८० ग्रामपंचायतीमध्ये सध्या १ हजार २१० कामे सुरु केले आहेत. यामुळे तब्बल ५२ हजार ७५४ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.गतवर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा ५० टक्के कमी पाऊस पडला. त्यामुळे अनेकांना निम्मे उत्पन्न झाले. परिणामी यावर्षी अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी अनेक नागरिक कामाच्या शोधात आहेत. कमी पावसाने शेती पडीक राहिली. परिणामी शेतीचे कामे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे कामाच्या शोधात अनेकांवर गाव सोडून जाण्याची पाळी आली आहे. काही मजूरांनी परप्रांतात जावून सोयाबीन, कापूस वेचणीची कामे केली. यातून त्यांना ५ ते १० हजार रूपये मिळाले. मात्र सद्या उन्हाळा सुरू असल्याने शेतीची कामेही संपली आहेत. परिणामी कामाच्या शोधात मजुरांची भटकंती होत आहे.शासनाच्या योजनेनुसार मजुरांनी ग्रामपंचायतीकडे कामाची मागणी केली. या मागणीवरून जिल्हा प्रशासनाने मजुरांना गावातच विविध कामे उपलब्ध करून दिले आहेत. रोजगार हमी योजनेतून ग्रामपंचायतस्तरावर पांदण रस्ता, रस्ता बांधकाम, नाला खोलीकरण, तलाव खोलीकरण, बोडी खोलीकरण, गाळ काढणे, मजगी, शेततळे, आदी कामे सुरू केले आहेत. त्यामुळे ५२ हजार ७५४ मजुरांना काम मिळाले आहे.कोरपना, भद्रावती तालुक्यातील मजुरांना कामांची प्रतीक्षाचमजुरांना आधार देण्यासाठी अनेक तालुक्यांमध्ये रोहयोची कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र कोरपना व भद्रावती तालुक्यात अद्याप एकाही ग्रामपंचायतस्तरावर रोहयोचा कामांचा शुभारंभ झालेला नाही. त्यामुळे मजुरांना कामांची प्रतीक्षा आहे. तर चिमूर तालुक्यात सर्वाधिक १७८ कामे सुरू असून त्यापाठोपाठ सिंदेवाही तालुक्यात १५९ व ब्रम्हपुरी तालुक्यात १४४ कामे सुरू आहेत. त्यामुळे मजुरांना दिलासा मिळाला आहे.एक हजार २१० कामे सुरूजिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत १ हजार २१० कामे सुरू आहेत. यात पांदण रस्त्याचे ९१ कामे सुरू असून या कामांवर १६ हजार ५६ मजूर काम करीत आहेत. तर सिमेंट क्रॉक्रीट रस्त्याच्या ६ कामांवर ७२, नाला खोलीकरणाच्या ४२ कामांवर १४ हजार १२७, तलाव खोलीकरणाच्या ३४ कामांवर ६ हजार ५६९, बोडी खोलीकरणाच्या २९ कामांवर १० हजार ५१२, बंधाऱ्यातील गाळ काढण्याच्या ४ कामांवर १०५, मजगीच्या ३१ कामांवर १ हजार ३५६, शेततळ्याच्या १ कामावर २३, घरकूल बांधकामाच्या ६२१ कामावर २ हजार ३९, वृक्षारोपणाच्या १५० कामावर ३५६, शौचालय बांधकामाच्या ६५ कामांवर २२४, शोषखड्डयाच्या ४ कामांवर ४, सिंचन विहीरीच्या १०२ कामावर १ हजार २१४ तर नॅडेपच्या ७ कामांवर ११ मजूर अशा १ हजार २१० कामांवर ५२ हजार ७५४ मजुर काम करीत आहेत.