शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 23:04 IST

मागील चार वर्षात अनेक शहरात कोटीचे काम केले आहे. येत्या वर्षात बेरोजगारांसाठी साखर कारखाना, सिंदेवाहीलाच कृषी विद्यापीठ शेतकऱ्यासाठी सिंचनाची सुविधा, तसेच गोसेखुर्द पाणी देण्यासाठी आपण प्रयत्नरत आहोत, असा विश्वास आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : सिंदेवाहीत विविध साहित्याचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : मागील चार वर्षात अनेक शहरात कोटीचे काम केले आहे. येत्या वर्षात बेरोजगारांसाठी साखर कारखाना, सिंदेवाहीलाच कृषी विद्यापीठ शेतकऱ्यासाठी सिंचनाची सुविधा, तसेच गोसेखुर्द पाणी देण्यासाठी आपण प्रयत्नरत आहोत, असा विश्वास आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.सिंदेवाही येथील सोमश्वर महाराज पटांगणावर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सत्कारा सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर किरण वडेट्टीवार, काँग्रेस कमिटीच्या प्रदेश समन्वयक शिवानी वडेट्टीवार, गडचिरोली जि. प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम, जि. प. गटनेता सतिश वारजुकर, माजी आमदार आनंदराव गेडाम, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, ब्रह्मपुरीच्या नगराध्यक्षा रिता उराडे, अ‍ॅड. रजनी हजारे, नंदा अल्लूरवार, युवा नेते डॉ. नितीन कोडवते, जेष्ठ काँग्रेस नेते रघुनाथ शेंडे उपस्थित होते. यावेळी विधवा गरजू महिलांना शिलाई मशीन अपंगांना तीनचाकी सायकल वितरण करण्यात आले.प्रास्ताविक यावेळी काँग्रेस अध्यक्ष रमाकांत लोधे, संचालन डॉ. अमर धम्मानी, आभार नगरसेवक युनूस शेख यांनी मानले. यावेळी कॉंग्रेस जेष्ठ अरूण कोलते, शहाध्यक्ष राहुल पटेल, हरि बारेकर आदी उपस्थित होते.