शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पोंभुर्णा तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा

By admin | Updated: January 15, 2015 22:49 IST

महसूल प्रशासनात तहसील कार्यालयाला अनन्यसाधारण महत्व आहे. तालुक्याच्या महसूल यंत्रणेत तहसीलदार आहेत. मात्र नायब तहसीलदार, लिपीक, शिपाई या सेवा संलग्नीत १० पदे रिक्त

पोंभुर्णा : महसूल प्रशासनात तहसील कार्यालयाला अनन्यसाधारण महत्व आहे. तालुक्याच्या महसूल यंत्रणेत तहसीलदार आहेत. मात्र नायब तहसीलदार, लिपीक, शिपाई या सेवा संलग्नीत १० पदे रिक्त असल्यामुळे येथील कार्यरत तहसीलदारांवर कामाचा ताण पडत आहे. परिणामी सामान्य नागरिकांचे कामे प्रभावित होत आहेत. जिल्हा प्रशासनाने पोंभुर्णा तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा तुटवडा दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.पोंभुर्णा तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्यासह नायब तहसीलदार तीन, लिपीक चार, अपर कारकून चार, शिपाई चार यांच्यासह एकुण ४२ पदांना मंजुरी आहे. मात्र आजमितीला या ठिकाणी ३२ कर्मचारी कार्यरत असुन दहा पदे रिक्त आहे. परिणामी येथील कार्यरत तहसीलदार राजेश सरवदे यांना प्रशासनाचा कारभार चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.नायब तहसीलदार दागमवार व पानपत्तुलवार हे सेवानिवृत्त झाल्यामुळे आजतागायत त्यांचे रिक्त झालेले पद भरण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित कामावरील ताणसुद्धा कार्यरत कर्मचाऱ्यांवर पडत आहे.तालुका महसूल प्रशासनाला जमिन मालकीची नोंद करणे, शेतीशी संबंधीत कर गोळा करणे, शालेय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणे, आपतकालिन योजना राबविणे, जमिन कायद्याची अंमलबजावणी करणे, शासकीय मालमत्तेवर देखरेख ठेवणे, मुद्रांक शुल्क कायद्याची अंमलबजावणी करणे, निवडणूक संदर्भातील कामे पार पाडणे, पिकांची आणेवारी ठरविणे आदी कामे करावी लागतात. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी व उपविभागीय स्तरावरील कामकाज करणे, असा कामाचा डोलारा सांभाळावा लागतो. यासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असताना येथील कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकाच्या कामाचा खोळंबा होत आहे. कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.जिल्हा प्रशासनाने सामान्य जनतेच्या हितासाठी व येथील प्रभावित होणाऱ्या कामांना गतिमान करण्यासाठी रिक्त असलेल्या पदाचा भरणा करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)