शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांनी घेतला धसका

By admin | Updated: August 4, 2014 23:39 IST

मागील काही दिवसांमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या काही शासकीय कार्यालयातील कारभार ढेपाळला आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. ढेपाळलेला कारभार सुरळीत

जिल्हा परिषद : मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांची अचानक भेटचंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या काही शासकीय कार्यालयातील कारभार ढेपाळला आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. ढेपाळलेला कारभार सुरळीत करण्यासाठी मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांनी आता पाऊल उचलले आहे. शासकीय कार्यालयांना अचानक भेट देवून कामचुकार कर्मचाऱ्यांना वटणीवर आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यामुळे कर्मचारी चांगलेच धास्तावले आहे.मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेतून ग्रामीण भागासाठी अनेक विकासात्मक कामे केल्या जाते. मात्र काही अधिकारी, कर्मचारी सामान्य नागरिकांना त्रास देण्याचे धोरण अवलंबित आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, कर्मचाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाव्या यासाठी कर्मचाऱ्यांना समजदारीचे धडे देण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र काही कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसताच त्यांनी आता थेट शासकीय कार्यालय, शाळा, आरोग्य केंद्र, अंगणवाडी, ग्रामपंचायत आदी कार्यालयाना अचानक भेट देवून पाहणी सुरु केली आहे. त्याचसोबतच नागरिकांकडून समस्या ऐकून घेत आहे. त्यामुळे आता जे कर्मचारी कामचुकारपणा करीत आहे त्यांची चांगलीच गोची झाली आहे.विशेष म्हणजे, जे कर्मचारी मुख्यालयी न राहता घरभाडे उचलत आहे. त्यांच्यावरही आता कुऱ्हाड येणार आहे.१ आॅगस्ट रोजी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी नकोडा येथे भेट दिली. यावेळी त्यांनी प्रथम आरोग्य केंद्राला भेट दिली. या भेटीत त्यांना आरोग्य सेविका गैरहजर असल्याचे दिसले. त्याचसोबत यावेळी एक रुग्ण महिला उपचारासाठी आली. हा प्रकार दिसताच मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी लागलीच आरोग्यसेविकेला निलंबित केले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. या भेटीत शाळेला सुटी नसतानाही शाळेला कुलूप लावून असलेले दिसते. त्यामुळे त्यांनी मुख्याध्यापकालाही निलंबित केले. एवढेच नाहीतर त्यांनी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वच्छते संबंधात चांगलेच खडसावले. ही बातमी वाऱ्यासारखी जिल्हाभर पसरली आणि कामचुकार कर्मचाऱ्यांची धडकी भरली. त्याचा परिणाम जिल्हातील काही शासकीय कार्यालयात जाणवू लागला. (नगर प्रतिनिधी)