शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळांचे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

By admin | Updated: September 4, 2015 00:58 IST

आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी डोंगराळ, दुर्र्गम, आदिवासी, नक्षलग्रस्त क्षेत्रात आश्रमशाळा उघडल्या.

वेतन अडले : शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपासमारपेंढरी (कोके) : आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी डोंगराळ, दुर्र्गम, आदिवासी, नक्षलग्रस्त क्षेत्रात आश्रमशाळा उघडल्या. परंतु युतीचे हे शासन आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचा खेळखंडोबा करीत आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवून शासन साधणार तरी काय? असा प्रश्न संघटनेला पडला आहे.युती शासनाने सन १९९९ मध्ये राज्यात कमी अंतरावर आश्रमशाळांची खैरात वाटली. त्यात अगोदरच काही ठिकाणी १० किलोमिटरच्या आत आश्रमशाळा कार्यरत होत्या. तसेच काळानुरूप आता आदिवासी मुलांची संख्यासुद्धा कमी झाली आहे. आदिवासी विभागाने यावर्षी शहरातील नामांकित इंग्रजी शाळेत इयत्ता पहिली ली व पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. याचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. आणखी जि.प. व माध्यमिक शाळेत मोफत माध्यान्ह भोजन, गणवेश, शिष्यवृत्ती व इतर सोयी सुविधा सुरू केल्या. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांचा लोंढा तिकडे वळत आहे. आघाडी शासनाने आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलांची शिष्यवृत्ती बंद केली आहे.एका विद्यार्थ्यामागे अनुदानित शाळेसाठी ९०० रुपये तर शासकिय व नामांकित इंग्रजी शाळेसाठी प्रत्येकी ५ हजार रुपये महिना दिला जातो. असा दुजाभाव शासन करीत असताना आश्रमशाळेत १०० टक्के विद्यार्थी उपस्थित कसे राहणार? यासाठी सदर कर्मचाऱ्यांना दोषी ठरवून त्यांचे माहे ुजलैपासूनचे वेतन कायमस्वरूपी रोखण्याचा घाट शासनाने घातला आहे. खर तर आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा शासनाचा डाव असल्याचा आरोप आदिवासी कर्मचारी संघटनेने केला आहे.एकीकडे शासन शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहे. त्यासाठी नवनवीन उपक्रम, कार्यक्रम राबविले जातात. मग आश्रमशाळांच्या बाबतीत शासनाचे असे धोरण का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पुढे हिंदूचा महत्त्वाचा सण पोळा हा आहे. पोळ्या अगोदर विदर्भातील कर्मचाऱ्यांचे माहे जुलै-आॅगस्टचे वेतन न झाल्यास कर्मचारी संघटना उपोषण-आंदोलन करणार. तसेच येत्या ५ सप्टेंबरला शिक्षक दिनी नागपूरच्या सत्कार समारंभात सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध करणार असल्याचा इशारा प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी दिला आहे. (वार्ताहर)