शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आपातग्रस्त शेतकऱ्यांचा निधी आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 23:40 IST

मागील हंगामात कपाशीच्या पिकाला बोंडअळीने फस्त केले तर धान पिकाला तुडतुड्या रोगाने ग्रासले. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार असून नुकसान भरपाईचा पाच कोटी ४२ लाखांचा पहिला हप्ता आला आहे.

ठळक मुद्देबोंडअळी व मावा तुडतुडा : वरोरा तालुक्याला पाच कोटी ४२ लाखांचा पहिला हप्ता

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : मागील हंगामात कपाशीच्या पिकाला बोंडअळीने फस्त केले तर धान पिकाला तुडतुड्या रोगाने ग्रासले. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार असून नुकसान भरपाईचा पाच कोटी ४२ लाखांचा पहिला हप्ता आला आहे.वरोरा तालुक्यातील ३० हजार हेक्टर मधील कपाशीला बोंडअळीने नुकसान पोहचवले होते. त्यात १४ हजार शेतकरी या बोंडअळीने आर्थिक संकटात सापडले होते. बोंडअळीने कपाशीच्या पिकावर आक्रमण केल्याने अनेक शेतकºयांनी कपाशीच्या पिकात नागर फिरविल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळी शासनाने कपाशीच्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिल्यानंतर कृषी विभागाने संयुक्त अहवाल शासनाकडे सादर केला. कपाशीच्या बोंडअळी व धान पिकावरील तुडतुड्या रोगाची नुकसान भरपाई १७ कोटी रुपये झाली. त्यातील पहिला हप्ता पाच कोटी ४२ लाख रुपये महसूल विभागास प्राप्त झाला आहे.पहिला हप्त्यामध्ये वरोरा सर्कलमधील २० गावे, शेगाव महसूल केंद्रातील ३८ व टेमुर्डा महसूल केंद्रातील पाच गावांना पहिल्या हप्त्यातील अनुदानाची रक्कम वाटप केली जाणार असून नुकसानग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. सदर रक्कम तीन टप्प्यात येणार असून उर्वरित दोन हप्ते क्रमाक्रमाने गावातील शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.सावली तालुक्याला सव्वादोन कोटी प्राप्तगेवरा : सावली तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सावली तालुक्याला १४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. यातील पहिला हप्ता सव्वा दोन कोटी रुपये प्राप्त झाले असल्याची माहिती तालुका प्रशासनाने दिली आहे. सावली तालुक्यात २०१७-१८ च्या खरीप हंगामात धानाचे २७ हजार ५२०.४५ हेक्टर वर पेरणी करण्यात आली होती. कापूस १६९ हेक्टरवर पेरणी करण्यात आली. त्यापैकी मावा तुडतुडा व बोंड अळीने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.एकूण क्षेत्रापैकी बाधीत क्षेत्राकरिता शासनाने अनुदान मंजूर केले आहे. अर्थात धानाच्या एकूण पेरणी क्षेत्रापैकी १२ हजार ७८७.३८ हेक्टरवरील व कापसाच्या १६९ हेक्टरपैकी ८८.०८ हेक्टरवरील पिकांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. या करिता तालुक्याला १४ कोटी रुपये मंजूर झाले आहे. सदर अनुदान तालुका प्रशासनाकडे प्राप्त होणार असून तीन हप्त्यात हे अनुदान येणार आहे. यातील पहिला हप्ता धान पिकास २ कोटी २५ लक्ष १५ हजार २०० रुपये व कापूस पिकांकरिता एक लाख ५६ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. तालुक्यातील तीन महसूल परिमंडळातील शेतकऱ्यांना प्राप्त झालेल्या अनुदानाच्या रकमेचे वाटप करण्यात येणार आहे.कपाशीच्या बोंडअळी व धान पिकाच्या तुडतुड्या रोगाची नुकसान भरपाईचा पहिला हप्ता आला असून नुकसानग्रस्त शेतकºयांनी आपल्या बँक खात्याचा क्रमांक तलाठ्याकडे द्यावा. यामध्ये एकाच सातबारावर अनेक नावे असल्यास एकाचे नावे संमतीपत्र तलाठ्याकडे सादर करावे.- सचिन गोसावीतहसीलदार, वरोरा