शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घ्या

By admin | Updated: August 22, 2015 01:39 IST

वनविभागाच्या सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एकाला अनुकंपा तत्वावर नोकरीवर सामावून घेण्यासाठी ....

वनमंत्र्यांना साकडे : शिष्टमंडळाने दिले निवेदनकोठारी : वनविभागाच्या सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एकाला अनुकंपा तत्वावर नोकरीवर सामावून घेण्यासाठी अनुकंपाधारकांनी कोठारीत स्वातंत्र्यदिनी झालेल्या कार्यक्रमात साकडे घातले. त्यांना विनवनी करून कुटुंबाची होत असलेली वाताहात थांबविण्यासाठी एकाला तरी नोकरीवर घ्यावे अशी विनंती केली. तसेच निवेदनही देण्यात आले.वनविभागात कार्यरत असताना आपले कर्तव्य बजावत असताना आलेल्या मृत्यूने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. घरचा कर्ता पुरूष एकाएकी निघून गेल्याने कुटुंबाची वाताहात होते. घरी दारिद्र निर्माण होवून मुलांचा शैक्षणिक, कौटुंबिक विकास थांबतो. परिणामी तरुण नैराश्यापोटी वाममार्गाने लागतो. त्याचे गंभीर परिणाम कुटुंबावर होते. वनविभागात कार्यरत मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांनांना नोकरी देण्यासाठी शासन विचाराधिन नाही. अनुकंपाधारकाचे वय निघून जात आहे. तरीही त्यास शासनाकडून नोकरीची संधी दिल्या जात नाही. ेकवळ निरनिराळे नियम बनवून अनुकंपाधारकाची फरफट सुरू आहे. कोणते ना कोणते कारण पुढे करून अनुकंपाधारकांना डावलण्याचा शासनाचा कट आहे. वनविभागात अनेक रिक्त पदे आहेत. ते वेळोवेळी भरले जातात. मात्र अनुकंपाधारकांना १० टक्के राखीव असल्याचे सांगण्यात येते. मात्र आजपर्यंत अनुकंपाधारकांना कुठेही संधी देण्यात आली नाही.सध्या राज्यात चंद्रपूर जिल्ह्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत. त्यांना अनुकंपाधारक अनेकदा भेटले. आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. मात्र त्यांच्याकडून अजूनपर्यंत योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने अनुकंपाधारकांत तीव्र नाराजी पसरली आहे. वनमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांनी अनुकंपाधारकांच्या समस्या अग्रक्रमाने सोडवून कुटुंबाची होत असलेली वाताहत थांबवून कुटुंबातील एकाला नोकरीत सामावून घेवून कुटुंबाला नवसंजीवनी द्यावी, यासाठी कोठारी येथे झालेल्या कार्यक्रमात अनुकंपाधारकांनी वनमंत्र्यांना साकडे घातले. (वार्ताहर)