शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सीएएविरुद्ध आंबेडकरी समाजही पुकारणार एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:01 IST

सिद्धार्थ विद्यालयाच्या सभागृहामध्ये खुशाल तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये प्रा. नामदेव कन्नाके, डॉ. सिराज खान, आनंद एंगलवार, सुब्रोतो दत्ता, किशोर पोतनवार, अ‍ॅड. कपिल भगत, भारत थुलकर, हिराचंद बोरकुटे, अयुबभाई कच्छी आदींनी मार्गदर्शन केले. यासंदर्भात सर्वसमावेशित बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचेही ठरविण्यात आले.

ठळक मुद्देचंद्रपुरात पार पडली बैठक : संविधान संवर्धन समितीचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएए, एनआरसी, एनपीआर विरुद्ध देशभरात आंदोलने सुरु आहे. या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र आता संविधानाला वाचविण्यासाठी आंबेडकरी समाजही या कायद्याविरुद्ध रस्त्यावर उतरणार आहे. याससंदर्भात चंद्रपूर येथे संविधान संवर्धन समितीची बैठक पार पडली. यावेळी जोपर्यंत सीसीए, एनआरसी, एनआरपी कायदे केंद्र सरकार मागे घेणार नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.येथील सिद्धार्थ विद्यालयाच्या सभागृहामध्ये खुशाल तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये प्रा. नामदेव कन्नाके, डॉ. सिराज खान, आनंद एंगलवार, सुब्रोतो दत्ता, किशोर पोतनवार, अ‍ॅड. कपिल भगत, भारत थुलकर, हिराचंद बोरकुटे, अयुबभाई कच्छी आदींनी मार्गदर्शन केले. यासंदर्भात सर्वसमावेशित बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचेही ठरविण्यात आले.बैठकीला प्रा. धनंरजय मेश्राम, अनिल रामटेके, अ‍ॅड. रवींद्र मोटघरे, विद्याधर लाडे, गौरीशंकर टिपले, डॉ. प्रजेश घडसे, प्रा. रवी कांबळे, अ‍ॅड. कपिल भगत, अ‍ॅड. भिमराव रामटेके, बैजू शिंदे, प्रा. सुरेश पाटील, आनंद कवाडे, देशक खोब्रागडे, संतोष डांगे, प्रा. कोमल खोब्रागडे, रवींद्र उमाटे, शिरीष गोगुलवार यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधक उपस्थित होते. प्रास्ताविक बंडू नगराळे, संचालन अंकुश वाघमारे यांनी तर आभार सुरेश नारनवरे यांनी मानले.अशी करणार जनजागृतीएनआरसीवर बहिष्कार टाकण्यासाठी वार्डावार्डात तसेच जिल्हाभर १८ मार्चपर्यंत जागृती करण्यात येणार आहे. या दरम्यान, शहराच्या ठिकाणी परिषदा घेण्यात येणार आहे. सरकारने कायदे मागे न घेतल्यास १८ मार्चनंतर जिल्हास्तरावर महामोर्चे काढण्यात येणार आहे.या आहेत मागण्याकेंद्र सरकारने सीएए, एनआरसी कायदे मागे घ्यावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, आदिवासींची त्यांच्या धर्मानुसार जनगणना करावी या मागण्यासुद्धा करण्यात येणार आहे. बिहारप्रमाणे महाराष्ट्र सरकारने एनआरसी, एनपीआर विरोधात ठराव पारित करण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे.