शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी अनियमिततेविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:26 IST

ब्रम्हपुरी तालुक्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत २०२०-२१ च्या धान खरेदीकरिता सात खरेदी केंद्रे चालू करण्यात आली व शेतकऱ्यांना बाजार ...

ब्रम्हपुरी तालुक्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत २०२०-२१ च्या धान खरेदीकरिता सात खरेदी केंद्रे चालू करण्यात आली व शेतकऱ्यांना बाजार समितीमार्फत सात-बाराप्रमाणे टोकन देऊन त्यानुसार अनुक्रमे धान खरेदी करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात असे न करता ज्या ज्या संस्थांकडे धान खरेदीचे काम दिले होते, तेथील लोकांनीच शेतकऱ्याच्या नावाने व्यवसाय चालू करून मर्जीतील लोकांचे व जे चिरीमिरी देतील, त्यांचे धान खरेदी करणे चालू केल्याचे शेतकऱ्याच्या निदर्शनास आले. ही बाब अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित प्रशासनाच्या वारंवार निदर्शनास आणून दिली. परंतु याकडे जाणीवपूर्वक संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे कुर्झा येथील शेतकऱ्यांनी उदय संस्था, ब्रम्हपुरीचे सचिव तथा भारतीय किसान संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष माहोरे यांच्या नेतृत्वाखाली १० मार्चला प्रशासनाविरोधात उपोषणास बसण्याचे ठरविले व तसे निवेदन प्रशासनाला दिले, मात्र पोलीस निरीक्षक इंगळे यांनी संबंधित शेतकऱ्यांना पोलीस स्टेशनला बोलावून कोरोनाचा व कलम १४४ चा विषय पुढे करून वरिष्ठांसोबत चर्चा करून मार्ग काढण्याकरिता काही दिवसांची मुदत मागून घेतली. त्यानुसार पोलीस निरीक्षक यांच्या सूचनेचा आदर करून उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले. परंतु अजूनही प्रशासनाकडून काहीही हालचाल न झाल्याने शेवटी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादासाहेब भुसे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना न्यायिक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. १७ मार्चपर्यन्त मागण्या पूर्ण न झाल्यास १९ मार्चपासून उपोषण करण्याचा इशारा शेतकरी रामकृष्ण थोटे, हेमंत खेत्रे, गणेश गायधनी, रमेश विखार, सुनील विखार, अशोक ठोंबरे आदींनी दिला आहे.