लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या वतीने तीन दिवस राबविलेल्या विशेष मोहिमेंतर्गत विदर्भातील ६६ लाख ३२ हजार ४२२ रुपये मुल्यांकनाच्या तब्बल ९७ वीज चोऱ्या उघडकीस आल्या. यासोबतच २१ लाख ३६ हजार २२१ रुपये मुल्यांकनाच्या ८० प्रकरणात इतर अनियमितता आढळून आल्या आहे.सुरक्षा व अंमलबजावणी विभागातर्फे महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील नागपूर, अकोला, यवतमाळ, वाशिम, अमरावती, बुलढाणा आणि वर्धा या सातही जिल्ह्यात ४ ते ६ जानेवारीदरम्यान ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत महावितरणच्या राज्यभरातील ३० मंडळातील भरारी पथकांचा सहभाग होता. या विशेष मोहिमेत सातही जिल्ह्यातील ४०१ वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली.त्यापैकी ९७ ठिकाणी थेट वीजचोरी तर ८० ठिकाणी वीज वापरातील अनियमितता आढळून आल्या. या दोन्हीचे मुल्यांकन तब्बल ८७ लाख ६८ हजार ६४३ रुपये आहे. उघडकीस आलेल्या एकूण १७७ प्रकरणात तब्बल नऊ लाख ८७ हजार ६९ युनिट्सची वीजचोरी झाल्याचे दिसून आले आहे.या मोहिमेत वीजचोरी आणि वीज वापरातील अनियमिततीची सर्वाधिक ३७ प्रकरणे वाशिम जिल्ह्यातील असून त्याखालोखाल नागपूरची ३६, अकोला २९, अमरावती २६, बुलढाणा २३, यवतमाळ २१ आणि वर्धा जिल्ह्यातील १३ प्रकरणे उघडकीस आली आहेत.याशिवाय वीजचोरीच्या ९७ प्रकरणांमध्ये सर्वाधिक १९ नागपूर जिल्ह्यातील असून त्याखालोखाल अमरावती जिल्ह्यातील १८, बुलढाणा जिल्ह्यातील १५, अकोला जिल्ह्यातील १४, वाशिम जिल्ह्यातील १३ तर यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील प्रत्येकी ९ वीजचोऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती चंद्रपूर येथील महावितरणचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी दिली.
विदर्भात ८७ लाखांच्या वीजचोऱ्या उघडकीस; नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 10:23 IST
महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या वतीने तीन दिवस राबविलेल्या विशेष मोहिमेंतर्गत विदर्भातील ६६ लाख ३२ हजार ४२२ रुपये मुल्यांकनाच्या तब्बल ९७ वीज चोऱ्या उघडकीस आल्या.
विदर्भात ८७ लाखांच्या वीजचोऱ्या उघडकीस; नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक
ठळक मुद्देमहावितरण भरारी पथकाची विशेष मोहीम