शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना वीज पंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:50 IST

अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना वीज पंप, तेल पंप, एचडीपी पाईप पुरविणे यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना कार्यान्वीत करण्यात येणार आहे. या योजनेचा निधी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदिलासा : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना वीज पंप, तेल पंप, एचडीपी पाईप पुरविणे यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना कार्यान्वीत करण्यात येणार आहे. या योजनेचा निधी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर हा निधी महावितरणकडे सोपविला जाणार आहे.अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना कृषी पंपाचे ऊर्जाकरण करणे यासाठी पुनविनयोजनाने उपलब्ध करुन देण्याकरिता अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना वीज पंप, तेल पंप, एचडी पाईपचा पुरवठा करणाऱ्या सुधारित आदिवासी उपाययोजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत समावेश करण्यात आला आहे. सदर कृषी वीज पंपांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता १८८.९३ कोटी रुपये खर्चुन उच्च दाब वितरण प्रणाली तयार करण्यात आली आहे. योजनेनुसार प्रति ग्राहक अडीच लाख रुपये इतका निधी अनुसूचित जमातीच्या कृषी वीज पंप ग्राहकास कृषीपंपचे ऊर्जीकरण करण्याकरिता शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महावितरणला निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले आहे. पैसे भरुन प्रलंबित असणाऱ्या अनुसूचित जमातीतील कृषी पंप ग्राहकांच्या एकूण संख्येला अनुसरुन प्रति ग्राहक अडीच लाख रुपये याप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत निधी उपलब्ध होणार आहे.अनुसूचित जमातीमधील ज्या शेतकºयांनी २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत रक्कम भरुन प्रलंबित आहे, अशा शेतकºयांची यादी तातडीने सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.