शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चिमूर तालुक्यातील विजेची समस्या कायमस्वरुपी निकाली निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 23:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिमूर : चिमूर विधानसभा क्षेत्रात सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांसमोर विजेचा मोठा प्रश्न होता. कमी दाबाच्या पट्टयामुळे ...

ठळक मुद्देकीर्तीकुमार भांगडिया : कोलारी येथे साकारणार १३२ केव्हीचे वीज केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर विधानसभा क्षेत्रात सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांसमोर विजेचा मोठा प्रश्न होता. कमी दाबाच्या पट्टयामुळे शेतकºयांना पिकांना पाणी देताना मोठ्या अडचणी जात होत्या. व्यावसायिक व नागरिकांनाही यामुळे त्रास सहन करावा लागत होता. ही समस्या हेरून आपण चिमूर तालुक्यातील कोलारा येथे १३२ केव्हीच्या उपकेंद्राला मंजुरी मिळविली. यासह ३३ केव्हीचे वीज केंद्रही अनेक गावात मिळविले. यामुळे विजेची समस्या आता निकाली निघणार आहे, अशी माहिती आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी दिली चिमूर तालुक्यासाठी मंजूर झालेल्या १३२ केव्ही उपकेंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.चिमूरचे वाढते शहरीकरण आणि वाढती विजेची मागणी, त्यामुळे होणारा कमी दाबाचा वीज पुरवठा या समस्येवर मार्ग काढीत पाच वर्षाच्या काळात चिमूर तालुक्यातील खडसंगी, जांभूळघाट, मासळ बु. येथे ३३ केव्हीचे केंद्र नव्याने मजूर करून कार्यान्वित केले. आज १३२ केव्ही व खांबाडा येथे ३३ केव्हीच्या केंद्राचे भूमिपूजन करून वीज समस्या आपण निकाली काढली आहे, असेही यावेळी आ. भांगडिया यांनी सांगितले. चिमूर तालुक्यासाठी १६ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या १३२ केव्ही उपकेंद्राचे शंकरपूर जवळच्या (कोलारी) चिमूर येथे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या हस्ते रविवारी भूमिपूजन पार पडले. यावेळी कोलारीच्या सरपंच गावंडे, भाजपा जेष्ठ नेते वसंत वारजूकर, प्राचार्य टिपले,सतीश जाधव, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश अणे, अधीक्षक अभियंता अविनाश निबाळकर, संजय आत्राम, प्रविणकुमार दामके आदी उपस्थित होते. यावेळी नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सतिश अणे म्हणाले, मे २०१९ मध्ये हे केंद्र मंजूर झाले असून कंत्राटदार नियुक्त असून कार्यारंभ आदेश दिला आहे. या प्रकल्पासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. ना. नितीन गडकरींनी नाममात्र शुल्कावर ९९ वर्षांसाठी लिजवर जागा दिल्याने हा केंद्र येथे उभारण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.खांबाडा येथेही ३३ केव्हीचे वीज उपकेंद्रचिमूर तालुक्यातील खांबाडा येथे ३३/११ वीज उपकेंद्र कार्यान्वित होईल. तेव्हा या परिसरातील शेतकरी व घरगुती वीज ग्राहकांना पूर्ण दाबाचा वीज पुरवठा होणार असून विजेची समस्या सुटेल, असे मत आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी खांबाडा येथील वीज उपकेंद्र भूमिपूजनप्रसंगी व्यक्त केले. यावेळी डॉ.श्याम हटवादे, वसंत वारजूकर, कार्यकारी अभियंता राठी, संजय जलगावकर, सरपंच हरी दडमल, डॉ. गजबे, रामेश्वर कोथळे, योगिता चौखे, दुर्गाताई चौखे उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीज