शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत थकबाकीचे बिल १४ व्या वित्त आयोगातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:59 IST

मागील कित्येक वर्षांपासून अनेक ग्रामपंचायतीकडे विद्युत पथदिव्यांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्याकरिता महावितरण कंपनीने कंबर कसली आहे.

ठळक मुद्देग्रा.पं. पदाधिकाऱ्यांत रोष : गावागावांतील विकास कामांवर बसणार खीळ

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : मागील कित्येक वर्षांपासून अनेक ग्रामपंचायतीकडे विद्युत पथदिव्यांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्याकरिता महावितरण कंपनीने कंबर कसली आहे. ही थकबाकी ग्रामपंचायतींनी स्वत:च्या निधीतून अथवा १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून वसूल केली जाणार असल्याने ग्रामपंचायतींमधील गावाचा विकास व इतर कामे खोळंबली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.१४ व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींना लोकसंख्यानुसार वितरित केला जातो. या निधीमधून आरोग्य, शिक्षण, उपजिविका, मागासवर्गीय कल्याण योजना व इतर कामे केली जातात. त्यातच बहुतांश ग्रामपंचायतींकडील स्वत:च्या निधी देखभाल, साहित्य खरेदी, दुरुस्तीवर खर्च होत असल्याने निधी शिल्लक राहत नाही. ग्रामपंचायतीच्या वतीने लावण्यात आलेल्या पथदिव्यांचे देयके मागील कित्येक वर्षांपासून महावितरणकडे अदा करण्यात आले नाही.लहान ग्रामपंचायतींकडे अडीच ते तीन लाखांची देयके थकित आहेत. तर मोठ्या ग्रामपंचायतींकडे दहा लाखांपेक्षा अधिक रक्कम थकित आहे. ही थकित रक्कम वसुलीकरिता महावितरण कंपनीने तयारी सुरू केली आहे. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतीने विद्युत पथदिव्यांची थकबाकी दिल्यास अनेक ग्रामपंचायतीकडे इतर कामाकरिता निधी शिल्लक राहणार नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीमधील विकास कामे करण्याकरिता निधी कुठून आणावा, हा प्रश्न ग्रामपंचायतींच्या कारभारींना पडला आहे. ग्रामविकास मंत्रालयाकडून सदर आदेश जारी झाल्याने सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांमध्ये खळबळ उडाली आहे.पथदिव्यांची थकीत देयके जिल्हा परिषदेने अदा करावी. स्वनिधी व १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून याची वसुली करण्यास वरोरा तालुका सरपंच संघटनेचा विरोध आहे.- राजेंद्र चिकटे, सरपंच तथा अध्यक्ष वरोरा तालुका सरपंच संघटना,