शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा शहरातील विद्युत कामे रेंगाळली

By admin | Updated: August 23, 2015 01:31 IST

शहरातील वीज वितरण प्रणाली भूमिगत करण्याची कामे केली जात असून वीज वितरण कंपनीने नव्याने ट्रान्सफार्मर बसविण्याचे कंत्राट एका कंपनीला दिले आहे.

नागरिकांना मनस्ताप : कंत्राटदारावर कार्यवाहीची कॉंग्रेस कमिटीची मागणीवरोरा: शहरातील वीज वितरण प्रणाली भूमिगत करण्याची कामे केली जात असून वीज वितरण कंपनीने नव्याने ट्रान्सफार्मर बसविण्याचे कंत्राट एका कंपनीला दिले आहे. मात्र कंत्राट घेणाऱ्या कंपनीने मागील दोन वर्षांपासून अनेक कामे रेंगाळत ठेवली आहेत. त्याचा नागरिकांना अकारण मनस्ताप सहन करावा लागत असून अशा कंपनीचा परवाना तातडीने रद्द करुन कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी वरोरा शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आली आहे.दोन वर्षापूर्वी वरोरा शहरात कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्याने वरोरा शहरात ३५ नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात यावे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते डोंगरगाव चौक व वीर सावरकर चौकापर्यंत जुने एलटी, स्ट्रीट लाईट व घरगुती विद्युत पुरवठा सुरु राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून आरटीपीडी योजनेंतर्गत कामे सुनील हायटेक कंपनीला देण्यात आलीत. या कंपनीने ट्रान्सफार्मर बसविण्याचे कामे पूर्ण केली. मात्र भूमिगत केबल टाकण्याचे काम मागील दोन वर्षांपासून केले नाही. काही ट्रान्सफार्मची कामे अर्धवट आहेत. येत्या काही दिवसांत गणेशोत्सव, नवरात्रं आदी उत्सव येत आहेत. या अर्धवट कामांमुळे या उत्सवात अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेही कामे तातडीने पूर्ण करावी अन्यथा कंत्राट घेणाऱ्या कंपनीचा परवाना रद्द करण्याची मागणी नगरसेवक तथा वरोरा कॉंग्रशहर अध्यक्ष छोटू शेख, लक्ष्मण गमे, आसीफ रजा, भोयर, कोहपरे, बाबा ठाकरे, आगबत्तनवार, गिद्देवार, अनिल झोटींग, सचिन मेश्राम, राहुल देव, संदीप विधाते, कादर शेख, चंद्रकांत पोटे, पाल, प्रफुल्ल लाखे आदींनी केले आहे.सदर निवेदन वीज वितरण कंपनीचे वरोरा येथील कार्यकारी अभियंता, विधीमंडळ उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आदींना देण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)