शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांना आता निवडणुकीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 06:00 IST

उंबरठयावर आलेल्या विधानसभा निवडणुकांचे वेध आता राजकारणी, प्रशासन यंत्रणा आणि राजकीय कार्यकर्त्यांना लागलेले आहेत. जिल्ह्यात पूरस्थितीमुळे एका बाजूला ओला दुष्काळ, तर दुसरीकडे कमी पावसाअभावी दुष्काळ, अशी अवस्था आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या अपुऱ्या पावसामुळे शेतीची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी करावे काय? : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून प्रशासन निवडणुकीत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विधानसभा निवडणुकांचे वेध आता सर्वांना लागले आहे. यामुळे जिल्ह्याचे वातावरण ढवळून निघालेले आहे. असे असताना शेतकरी मात्र मोठया अडचणीच्या स्थितीत आहे. पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली आले होते. त्यांना त्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करून शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. मात्र प्रशासन आता निवडणुकीच्या कामात गुंतले असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.उंबरठयावर आलेल्या विधानसभा निवडणुकांचे वेध आता राजकारणी, प्रशासन यंत्रणा आणि राजकीय कार्यकर्त्यांना लागलेले आहेत. जिल्ह्यात पूरस्थितीमुळे एका बाजूला ओला दुष्काळ, तर दुसरीकडे कमी पावसाअभावी दुष्काळ, अशी अवस्था आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या अपुऱ्या पावसामुळे शेतीची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. शेतात दोन वर्षांपासून पिके मनासारखी झालेली नसल्यामुळे शेतकºयांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. पीक आणि इतर कर्ज पुन्हा थकीत असल्याने शेतकऱ्यांच्या मागे वसुलीचा दणका सुरू होईल. दुष्काळी अवस्थेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. गणशोत्सव काळात पाऊस उसंत घेईल, या आशेवर शेतकरी होते; परंतु आतापर्यंत तरी जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाची उघड झाप सुरूच आहे. आता नवरात्रीत पाऊस जाईल या आशेवर शेतकरी आहेत. त्या वेळीही पाऊस न गेल्यास कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना अतिशय अडचणीची अवस्था निर्माण झाली आहे. शेती-शेतकरी अडचणीत आला आहे. अशावेळी निवडणुकांचे बिगुल वाजू लागल्याने आता हे सर्व प्रश्न मागे पडल्यासारखे झाले असून आता निवडणुकांच्या चर्चेत लोक, तर डावपेचात राजकारणी रंगू लागले आहेत. आता प्रत्येक समस्येला नेत्यांकडे एकच उत्तर ‘निवडणुकी नंतर पाहू’असे झाले आहे.ग्रामीण भागातही चर्चा रंगू लागल्याग्रामीण भागातील वातावरणात राजकारणाचे रंग भरू लागले आहे. शेतकरी सोडून इतर मंडळी विधानसभा निवडणुकीचे वेध घेऊ लागले आहेत. मतदार याद्या आणि निवडणुकांच्या इतर कामात प्रशासन आतापासूनच गुंतले गेल्याने ओला दुष्काळ उपाययोजनांचे काय होणार, हो मोठा प्रश्न आहे. निवडणुकीच्या कामाबरोबरच दुष्काळ निवारणाच्या कामाकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे.पोलीसही लागले तयारीलानिवडणुकांचा ज्वर जसा वाढू लागला तसे कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. निवडणुकीचे वातावरण यावेळी अत्यंत चुरशीचे असल्याने गावोगावी राजकीय गट चांगलेच सक्रिय झाल्याने कुठेही, केव्हाही तणाव निर्माण होऊ शकतो, अशी स्थिती आहे. पोलिसांनी याचा अंदाज घेऊन आतापासूनच तयारी सुरू केली आहे. निवडणुकांची चाहूल लागताच ‘सोशल मीडिया’वरील वाचाळवीर चेकाळले आहेत, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची कसरत पोलिसांना करावी लागणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा