शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षाची निवडणूक सहा महिने लांबली

By admin | Updated: June 18, 2014 00:08 IST

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवीन नगराध्यक्षाची निवडणूक होणार होती. ती आता सहा महिने लांबणीवर गेली आहे. नगराध्यक्षासोबतच उपाध्यक्षालाही सहा महिने मुदतवाढ मिळाली आहे.

बल्लारपूर : जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवीन नगराध्यक्षाची निवडणूक होणार होती. ती आता सहा महिने लांबणीवर गेली आहे. नगराध्यक्षासोबतच उपाध्यक्षालाही सहा महिने मुदतवाढ मिळाली आहे. आता, या दोनही पदांच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात होणार आहे.विद्यमान नगराध्यक्षाचा अडीच वर्षाचा कार्यकाल २९ जूनला संपत असल्यामुळे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवीन नगराध्यक्षाची निवडणूक होणे निश्चित होते. या निवडणूकीच्या कार्यक्रमाच्या घोषणेकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, ही निवडणूक सहा महिने पुढे गेल्यामुळे विद्यमान नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षांना आणखी सहा महिने कारभार बघावा लागणार आहे. सहा महिने निवडणूक लांबल्यामुळे या पदाच्या निवडणूकीकरिता इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. बल्लारपूर नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या रजनी घनशाम मुलचंदानी या आहेत. या नगरपरिषदेचा पुढील नगराध्यक्ष अनुसूचित जमाती महिलांकरिता राखीव आहे. येथे त्या प्रवर्गाच्या काँग्रेसच्या छाया मडावी आणि अपक्ष मीना मडावी या दोनच नगरसेविका आहेत व त्यांची नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत उभे राहण्याची तयारी चालली होती. त्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या हालचालीही सुरू झाल्या होत्या. ही निवडणूक सहा महिने पुढे गेल्याने साऱ्या हालचाली आता थंडावल्या आहेत. विधानसभा निवडणूकीचा ताण असल्यामुळे नगराध्यक्षाच्या निवडणूका पुढे ढकलल्याचे सांगण्यात येते. पण, लोकसभा निवडणूकीत भाजपाची लाट चालली. या ताज्या लाटेचा परिणाम नगराध्यक्षाच्या निवडणूकीवर पडू नये आणि काँग्रेसला याही निवडणूकीत फटका बसू नये याकरिता राज्य शासनाने नगराध्यक्षाच्या निवडणूका पुढे ढकलल्या आहेत, असे काहींचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)