शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आठ टक्के वृद्धांना अल्झामर्स डिमेंशियाचा धोका

By admin | Updated: September 21, 2016 00:48 IST

दिवसेंदिवस अल्झामर्स डिमेंशिया या रोगाचे प्रमाण वाढत आहे. जगातील जवळपास दोन कोटी लोकांना अल्झामर्स डिमेनशिया रोगाने बाधित आहेत.

परिमल डोहणे चंद्रपूर दिवसेंदिवस अल्झामर्स डिमेंशिया या रोगाचे प्रमाण वाढत आहे. जगातील जवळपास दोन कोटी लोकांना अल्झामर्स डिमेनशिया रोगाने बाधित आहेत. तर भारतात ४० लाख लोकांना हा आजार झाला आहे. वाढत्या धकाधकीच्या जीवनात विविध आजारांनी थैमान घातले आहे. यात असाध्य रोगही आहेत. या विविध आजारांपासून सुटका करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचे प्रयत्न सुरु असले तरी, रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ चिंतेचा विषय आहे. बदलत्या जीवनशैलीच्या परिणामामुळे अल्झामर्स डिमेनशिया या आजाराच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. चुकीचा आहार, वेळी-अवेळी होणारे जेवन, मद्यपान, धुम्रपान, गुटखा पदार्थांच्या सेवनामुळेही अल्झामर्स डिमेनशियाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे.अल्झामर्स डिमेनशिया हा आजार वयोवृद्ध नागरिकांना होत असतो. साधारणत: हा आजार ६५ वर्षांवरील लोकांना होतो. डिमेंशिया या रोगात साधारणत: ७० ते ८० टक्के रुग्ण अल्झामर्स डिमेनशियाने ग्रस्त असतात. संभवत: ६५ ते ७० या वयोगटातील आठ टक्के वृद्धांना हा आजार होण्याची शक्यता असते. डिमेंशिया या आजारात आपल्या स्मृतीचा व आकलन क्षमताचा हळूहळूृ ऱ्हास होतो. स्मरणशक्ती कमी होते. , नातलगांची नावे विसरणे, बोलण्यासाठी शब्द न सुचणे, रस्ता लक्षात न राहणे, पैशाचा हिशोब न जमणे, बहूतेक गोष्टी लक्षात न राहणे, दैनंदीन जिवनातील स्वत:ची कामे विसरणे, चित्र विचित्र आकृत्या दिसणे अशाप्रकारची लक्षणे या आजारामधील रुग्णांमध्ये दिसून येतात. हा आजार पूर्णत: बरा होत नसला तरीही, या आजारावर नियंत्रण ठेवता येते. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार उपचार करणे गरजेचे असते. तसेच नेहमी वाचन करणे, पझल, कोडे सोडविणे, बुद्धीबळ, वाद्य वाजविणे, नृत्य करणे तसेच बौद्धिक खेळ खेळणे याद्वारे आपण या रोगांवर नियंत्रण करु शकतो.दिवसेंदिवस या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. हा आजार पूर्णत: बरा होत नसला तरीही, या आजारावर नियंत्रण ठेवता येते. त्यासाठी सकस आहार घेणे, नियमीत व्यायम करणे व डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार उपचार करणे गरजेचे असते. तसेच नेहमी वाचन करणे, पझल, कोळे सोडविणे, बुद्धीबळ खेळणे, वाद्य वाजविणे, नृत्य करणे तसेच बौद्धीक खेळ खेळणे याद्वारे आपण या रोगांवर नियंत्रण करु शकतो.डॉ.विवेक बांबोडे, चंद्रपूर.