शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या गावात शिक्षण आपल्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:23 IST

रमाबाई आंबेडकर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम उदय गडकरी सावली : कोरोना महामारीने संपूर्ण जग थांबले असताना ग्रामीण विद्यार्थी ज्ञानार्जनात मागे ...

रमाबाई आंबेडकर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

उदय गडकरी

सावली : कोरोना महामारीने संपूर्ण जग थांबले असताना ग्रामीण विद्यार्थी ज्ञानार्जनात मागे राहू नये, या उदात्त हेतूने सावली येथील रमाबाई आंबेडकर विद्यालयाच्या अध्यापकांनी विद्यालयाचे विद्यार्थी असलेल्या गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन ‘शिक्षण आपल्या दारी’ उपक्रम सुरू केला आहे.

या स्तुत्य उपक्रमाचे सर्व पालकांनी स्वागत केले आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीने सर्वत्र लाॅकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली. शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. याचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनावर होत असल्याने विद्यार्थ्यांचे पालक व अध्यापक ही चिंताग्रस्त झाले. त्या अनुषंगाने रमाबाई आंबेडकर विद्यालय सावलीच्या अध्यापकांनी एकमुखी निर्णय घेऊन ज्या गावांमध्ये विद्यालयाचे विद्यार्थी आहेत, त्या गावात जाऊन विद्यार्थ्यांना शिकविण्याचा उपक्रम हाती घेतला. मोखाळा, कढोली, हरांबा, साखरी, लोंढोली, उसेगाव, सिंदोळा, भट्टीजांब, मालपीरंजी, भारपायली यासारख्या ठिकाणी जाऊन आठ दहा विद्यार्थ्यांना एकत्र करून ज्ञानार्जनाचे कार्य ५ जुलैपासून सुरु केले. मागील वर्षी विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न या ‘शिक्षण आपल्या दारी’ उपक्रमाने सुरू आहे.

बॉक्स

ऑनलाईन शिक्षणापासून विद्यार्थी होते वंचित

ऑनलाईन वर्ग सुरू करण्याच्या सूचना सर्व विद्यालयांना दिल्या असल्या तरी ग्रामीण भागातील तसेच गरीब विद्यार्थी या सुविधेपासून वंचित होते. त्यामुळे ते शैक्षणिक प्रवाहातून मागे राहिले. या बाबींचा गंभीरपणे विचार करून रमाबाई आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. एल. शेंडे यांनी सह अध्यापकांना प्रवृत्त केले. स्वयंप्रेरणेने चालवीत असलेल्या या उपक्रमामुळे मागील दीड वर्षांपासून शैक्षणिक प्रवाहापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना निश्चितच प्रवाहात आणता येईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

कोट

श्रीमंत पालकांनी आपल्या पाल्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून त्यांचे शैक्षणिक वातावरण कायम ठेवले. मात्र गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय दिसत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे केवळ वेतन भोगी न राहता समाजाचे आम्ही काही देणे लागतो म्हणून आमच्या विद्यालयाने ‘शिक्षण आपल्या दारी’ हा उपक्रम स्वयंप्रेरणेने राबविण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाला पालक व विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

-चंदा रायपुरे (गेडाम) अध्यापक रमाबाई आंबेडकर विद्यालय सावली.