शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार

By admin | Updated: June 29, 2017 01:37 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभागातंर्गत येत असलेल्या चिमूर पंचायत समिती शिक्षण विभागाच्या कार्यालयात

बिंदूनामावलीत अनेक चुका : शिक्षक संघटनेचा आरोप लोकमत न्यूज नेटवर्क चिमूर : जिल्हा परिषद शिक्षण विभागातंर्गत येत असलेल्या चिमूर पंचायत समिती शिक्षण विभागाच्या कार्यालयात शिक्षकांची बिंदूनामावली यादी आहे. शिक्षकांनी बिंदूनामावली यादी चाळून बघितली असता त्या बिंदुनामावलीत भरपूर चुका आढळून आल्यात, जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून अशाप्रकारच्या चुका होणे म्हणजे विनाकारण शिक्षकांनाच त्रास देण्याचा प्रकार असल्याचा आरोप महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती तालुका शाखा चिमूरने केला आहे. कार्यालयात शिक्षकांचे सेवापुस्तक अद्ययावत आहे. सेवापुस्तकाच्या आधारे शिक्षकांची बिंदुनामवली तयार करायला पाहिजे होती. मात्र जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून तसे होताना दिसत नाही. जिल्हा परिषद शिक्षणाच्या लिपिकामुळे हा सारा प्रकार घडलेला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. अशा चुका करणाऱ्या संबंधीत लिपिकांवर वरिष्ठ अधिकारी कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नसल्यामुळे चुकीची माहिती सादर करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत असतात. या चुकामध्ये संबंधीत लिपिकांचा काहीतरी हेतू दडलेला असतो. मात्र शिक्षकांची थोडीशी जरी चुकझाल्यास जिल्हा परिषद संबंधीत शिक्षकास निलंबनाची कारवाई करीत असते. मात्र बिंदूनामावलीत चुका करणाऱ्यांवर जिल्हा परिषद प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत नाही. असाही आरोप संघटनेने केले आहे. लिपिकांने तयार केलेल्या यादीमध्ये एखाद्याचा निवड प्रवर्ग जर ओपन असेल व जात गोंड, कुणबी असेल तर जातीचा प्रवर्ग हा ओपनच दर्शविलेला आहे. शिक्षकांची जात कुठल्या संवर्गामध्ये समाविष्ट येते याचीही माहिती नसणे ही शोकांतिका आहे. तसेच नियुक्ती दिनांक, जन्मदिनांक, एखाद्याची जात बदलवून ठेवणे अशा अनेक प्रकारच्या चुका यादीमध्ये आहेत. शिक्षक विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे शिक्षकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधीत शिक्षकांनी केलेल्या अर्जाप्रमाणे मूळ सेवापुस्तक तपासून नव्याने शिक्षक बिंदुनामावली प्रत्येक गटशिक्षणाधिकाऱ्याने अद्यावत करुन घ्यावी, व चुका करण्याचे टाळावे, शिक्षकांच्या संबंधीत प्रकरणास जे दोषी असेल त्यांचेवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा चिमूरने केलेली आहे.