शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

इको-प्रोचे किल्ला स्वच्छता अभियान प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 23:42 IST

स्वच्छ भारत अभियान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुआयामी अशा धोरणाची फलश्रुती असून आज प्रत्येक क्षेत्रातील नागरिक स्वच्छतेच्या कार्यात स्वत:ला झोकून देत आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : स्वच्छता अभियानाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: स्वच्छ भारत अभियान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुआयामी अशा धोरणाची फलश्रुती असून आज प्रत्येक क्षेत्रातील नागरिक स्वच्छतेच्या कार्यात स्वत:ला झोकून देत आहे. या राष्टÑव्यापी अभियानास गती देण्याचे प्रयत्न करीत आहेत. स्वच्छतेबाबत जागृक्ता निर्माण झाल्याने सर्वत्र हे कार्य स्वयंस्फूर्तीने होत आहे. चंद्रपुरातील ऐतिहासीक गोंडकालिन वारसाचे जतन, संरक्षण व स्वच्छता या कामी इको-प्रो या संस्थेने घेतलेला पुढाकार सामाजिक प्रेरणेला नवी दिशा देणारा असून अभिमानास्पद आहे. या कार्यातून अनेकांना निश्चितपणे दिशादर्शन होईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.इको-प्रो या संघटनेद्वारा राबविण्यात आलेल्या किल्ला स्वच्छता अभियानास रविवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. ना. अहीर यांनी किल्लास्थळी जावून या स्वच्छता अभियानाचे अवलोकन केले. यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्र्यासमवेत महापौर अंजली घोटेकर, झोन सभापती आशा आबोजवार, इको-प्रोचे संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे, भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी शिंदे, इतिहास अभ्यासक अशोकसिंह ठाकूर, नगरसेवक रवी आसवानी, राहूल घोटेकर, छबू वैरागडे, कुळमेथे, शितल आत्राम, मनपा शहर अभियंता महेश वाढई, प्रशांत शिंदे व इको-प्रोचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.याप्रसंगी ना. अहीर यांनी जटपूरा गेट, रामाळा तलाव रोड, बगड खिडकी परिसरातील किल्ला व येथील दुरावस्थेबाबत माहिती जाणून घेतली. या देशभरातील सुंदर अशा वारशाचे जतन, संवर्धन व संरक्षण सरकारी यंत्रणा तसेच लोक सहभागातून करण्याचे आपले प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. चंद्रपूर किल्ला संवर्धन, ऐतिहासिक पर्यटन विकास महत्वपूर्ण बाब असून या किल्ल्यावरुन हेरीटेज वॉक, गोंडराजे समाधी स्थळावर, लाईट शोच्या माध्यमाने या इतिहासाचे पर्यटकांसमोर सादरीकरण, शहरात मॉर्निंग वॉककरिता किल्ल्यावरील पादचारी मार्गाचा वापर, बुरुजावर योग प्रशिक्षण, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहली व अन्य बाबींकरिता या किल्ल्याचे संवर्धन पुर्नबांधकाम किल्ल्यावरील पादचारी मार्गाची दुरुस्ती, नियमित स्वच्छता याकरिता पुरातत्व विभाग, जिल्हा प्रशासन व महानगरपालिका या समन्वय व नियोजनातून कार्यवाही करावी असे निर्देश देतानाच या बाबत बैठकीचे आयोजन करण्यात यावे अशी सूचना उपस्थित अधिकाºयांना केली.इको-प्रो सदस्यांनी १५९ दिवस अभियान राबवून समाज व प्रशासनापुढे नवा आदर्श ठेवला. जिद्द, परिश्रम व सातत्य या बळावर इकोप्रो ने स्वच्छता अभियान साध्य केले. याबद्दल या सर्वांचे अभिनंदन करीत हे कार्य करताना त्यास लोक चळवळीचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी या सदस्यांना आवाहन केले.यावेळी सर्व सदस्यांना भेटवस्तू देवून सन्मान केला. इको-प्रोच्या वतीने बंडू धोतरे यांनी स्वच्छता स्थळी भेट देवून मनोबल वाढविल्याबद्दल केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. अहीर यांचे आभार मानले.