शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

चिमूर, सिंदेवाही व नागभीड येथे इको पार्क उभे राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:29 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी आधुनिक बाग-बगिचे उभे राहावेत, यासाठी प्रयत्नरत असणारे राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी चिमूर, सिंदेवाही व नागभीड येथे इको पार्कसाठी निधी मंजूर केला आहे. चंद्रपूर, मूल, पोंभूर्णा आधी तालुक्यांच्या ठिकाणानंतर आता या तीन तालुक्यात अत्याधुनिक इको पार्क उभा राहणार आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांच्याकडून मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी आधुनिक बाग-बगिचे उभे राहावेत, यासाठी प्रयत्नरत असणारे राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी चिमूर, सिंदेवाही व नागभीड येथे इको पार्कसाठी निधी मंजूर केला आहे.चंद्रपूर, मूल, पोंभूर्णा आधी तालुक्यांच्या ठिकाणानंतर आता या तीन तालुक्यात अत्याधुनिक इको पार्क उभा राहणार आहे.चंद्रपूर महानगर, चंद्रपूर शहर, मूल नगरपालिका, पोंभूर्णा नगरपंचायत येथे अत्याधुनिक बाग निर्माण करण्याच्या संकल्पाला पूर्ण केल्यानंतर आता या तीन तालुक्याच्या ठिकाणी इको पार्क तयार करण्याच्या कामाला आज पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख तालुक्यांच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना अन्य मोठ्या शहरांप्रमाणे अत्याधुनिक इको पार्कची सुविधा मिळावी, यासाठी त्यांनी हा निधी उपलब्ध केला आहे.ब्रह्मपुरी व मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक यांच्याकडून या संदर्भात मागणी करण्यात आली होती. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या अंतर्गतही मोठ्या प्रमाणात छोटे-छोटे इको पार्क निर्माण केले आहे. याशिवाय चंद्रपूर महानगराच्या सीमावर्ती भागात बल्लारपूर रोडवरदेखील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पार्क दिमाखात उभे झाले आहे. शहरासाठी हा पार्क एक मोठी ओळख झाली आहे. मूल येथील पार्कदेखील नागरिकांच्या पसंतीला उतरले आहे. तर पोभुर्णासारख्या छोट्या ठिकाणीदेखील इको पार्कला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सर्व तालुक्याच्या ठिकाणी इको पार्क उभारण्याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रयत्न सुरू आहेत.बल्लारपूरजवळ तर राष्ट्रीय दर्जाचे बॉटनिकल गार्डन उभे राहत आहे.